पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली 9 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनता दरबाराचे आयोजन - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Sunday, 8 February 2026

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली 9 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनता दरबाराचे आयोजन

 


*पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली  9 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनता दरबाराचे आयोजन*

 

 *पालघर येथे होणाऱ्या जनता दरबारामध्ये पालकमंत्री गणेश नाईक नागरिकांशी थेट संवाद साधणार*


पालघर दि. ६ फेब्रुवारी : वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली  दि.9 फेब्रुवारी,2026 रोजी दुपारी  12  वाजता नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे जनता दरबाराचे आयोजन   करण्यात येणार आहे. या जनता दरबारामध्ये नागरिकाच्या समस्या , अडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक नागरिकाशी थेट संवाद साधणार आहेत.

नागरिकांनी आपल्या समस्याचे , प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे दि. 9 फेब्रुवारी, 2026 रोजी  मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.

 

   जनता दरबारामध्ये नागरिकांच्या तक्रारी अर्जाचे निवारण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित राहणार आहेत. 

  यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता.

  दि, 9 फेब्रुवारी, 2026 रोजी  नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे  होणाऱ्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या समस्या किंवा प्रश्नाचा  निपटारा करून घ्यावा असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले .

     नागरिकांसाठी तळ मजल्यावर संगणक टोकन घेतल्यावर विभागनिहाय अर्ज नोंदणी करिता टेबल तपशील  पुढीलप्रमाणे 

महसूल विभाग 

   टेबल क्र.2 मध्ये समाविष्ट नसणाऱ्या उर्वरित सर्व शाखा - नियोजन सभागृहासमोर डायनिंग हॉल शेजारी, 1. भूसंपादन 2.पुनर्वसन 3.पुरवठा - नियोजन सभागृहासमोर डायनिंग हॉल शेजारी, जिल्हा परिषद, पालघर - नियोजन सभागृहासमोर जीना क्र. 5 समोर, 1. वसई विरार म.न.पा. 2. नगर पालिका प्रशासन विभाग - कक्ष क्र.219जवळ, 1. भूमी अभिलेख विभाग 2. सह जिल्हा निबंधक (मुद्रांक शुल्क) 3. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था - कक्ष क्र.220जवळ, 1. वन विभाग 2. कृषी विभाग 3.आरोग्य विभाग - कक्ष क्र.220 पुढे जीना क्र.6 समोर, 1. महावितरण 2.राज्य परिवहन महामंडळ (ST) 3. बी.एस.एन.एल. (BSNL), कक्ष क्र.220 पुढे जीना क्र.6 समोर, 1. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) 2. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण - कक्ष क्र.224 च्या पुढे क्र.9 टेबल ला लागून, 1. पाटबंधारे विभाग 2. जलसंधारण विभाग - कक्ष क्र.224 च्या शेजारी, 1. पोलीस आयुक्त, मिरा भाईंदर वसई विरार 2. जिल्हा पोलीस अधीक्षक - मा.जिल्हाधिकारी यांचा कक्ष क्र. 201 ला लागून, 1. मत्स्य विभाग

2. पत्तन विभाग 3. बंदर अधिकारी (मेरी टाइम बोर्ड) 4. जिल्हा उद्योग केंद्र / लघु उद्योग (DIC) - कक्ष क्र. 201 व 202 च्या दरम्यान, 1. अन्न व औषध प्रशासन विभाग 2. सहायक आयुक्त समाजकल्याण 3. जात पडताळणी कार्यालय  4. सहायक कामगार आयुक्त - कक्ष क्र. 202 ला लागून, 1. नगर रचना विभाग (ADTP) 2. एम. आय. डी. सी. (MIDC) 3. रेल्वे प्रशासन 4. एम. टी. डी. सी. (MTDC) - कक्ष क्र. 204 ला लागून, 1. जिल्हा नियोजन अधिकारी 2. जिल्हा क्रिडा अधिकारी 3. वस्तू व सेवा कर विभाग 4. जिल्हा कोषागार अधिकारी - कक्ष क्र. 204 च्या समोर, 1. जिल्हा महिला व बालविकास विभाग 2. जिल्हा आयुक्त कौशल्य विकास 3. जिल्हा दुग्ध विकास अधिकारी - कक्ष क्र. 204 व 207 च्या दरम्यान, 1. महा.प्रदूषण महामंडळ  (MPCB ) 2. अग्रणी बँक - कक्ष क्र. 211 ला लागून, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,डहाणू - कक्ष क्र. 213 ला लागून, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,जव्हार - कक्ष क्र. 213 समोर, 1. राज्य उत्पादन शुल्क विभाग ( State Excise) 2. प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) - कक्ष क्र. 213 समोरचा पॅसेज, उर्वरित सर्व शासकीय कार्यालये - कक्ष क्र. 213 समोरचा पॅसेज.

Home Admin Contact About
Home Admin Contact About