कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय इमारतीचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Tuesday, 27 January 2026

कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय इमारतीचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

 


*कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय इमारतीचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन*


*शेतकरी हितासाठी नियोजनबद्ध विकास साधणार*



         *...पालकमंत्री गणेश नाईक*


पालघर दि २६ जानेवारी: शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीच्या सर्व घटकांना न्याय देणारी, आधुनिक कृषी उत्पन्न बाजार समितीची नवीन इमारत शेतकरी हितासाठी नियोजनबद्ध विकास साधणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.

वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  नव्या कार्यालय इमारतीचे भूमिपूजन नंडोरे नाका येथे उत्साहात पार पडले. 

 यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार स्नेहा दुबे-पंडीत, नगराध्यक्ष उत्तम घरत, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पुरुषोत्तम पाटील, उपनगराध्यक्ष राजेंद्र आत्माराम पाटील, उपसभापती उत्तम मधुकर पाटील,  जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी  व  शेतकरी-व्यापारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले की, “कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा न्यायालयीन प्रक्रियेतून कायदेशीररीत्या समितीच्या ताब्यात आली आहे. आता त्या जागेवर शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हिताची, पारदर्शक आणि कार्यक्षम बाजार व्यवस्था उभी करणे ही आपली जबाबदारी आहे.” गाळे, दुकाने, शेतकऱ्यांसाठी व व्यापाऱ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा असलेली इमारत उभारण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले.

“मी जाती, भाषा,  यापलीकडे जाऊन काम पाहतो. चेहरा नव्हे तर काम महत्त्वाचे आहे,” असे स्पष्ट करत पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून कोणताही प्रश्न प्रलंबित राहणार नाही, असे सांगितले .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक समाजाचा विकास हक्काने, आत्मविश्वासाने व्हावा, हीच शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

 “शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, हा एपीएमसीचा मूळ उद्देश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर, हरित विकास प्रकल्प आणि जिल्हा नियोजन व विकास आराखड्यामुळे येणाऱ्या काळात मोठा बदल घडणार असून, “एकही शेतकरी किंवा व्यापारी वंचित राहणार नाही,” असा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.  

भूमिपूजनाच्या निमित्ताने पालघरच्या कृषी बाजार व्यवस्थेला नवी दिशा मिळत असून, शेतकरी-केंद्रित विकासाचा हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

बोईसर येथील स्वारोग्य क्लिनिकचे उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले.

Home Admin Contact About
Home Admin Contact About