वसई-विरार शहर महानगरपालिका
निवडणूक विभाग दि.०८/११/२०२५
*वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता आरक्षण सोडत दि.११ नोव्हेंबर २०२५ रोजी महानगरपालिका मुख्यालयात संपन्न होणार*
मा.राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या आदेशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढणे, तसेच आरक्षणाचे सोडत प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागविण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात येत असून त्यानुसार आरक्षण सोडत मंगळवार *दि.११ नोव्हेंबर, २०२५* रोजी *सकाळी ११.००* वा. *वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्यालय, दुसरा मजला, विरार (प)* येथे संपन्न होणार आहे.
आरक्षणाचे प्रारूप सोमवार दि.१७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल व त्यावर दि.१७ नोव्हेंबर २०२५ ते २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत या कालावधीत नागरिकांना हरकती व सूचना सादर करता येतील. हरकती व सूचना ह्या महानगरपालिका मुख्यालय, निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर करता येतील. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतीम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.
