वसई विरार शहर महानगरपालिका
अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभाग
दि.०७/११/२०२५
वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत अनधिकृत बांधकाम निष्कासन करण्याकरीता मा. आयुक्त साो. यांच्या निर्देशानुसार विशेष पथक नेमणूक करण्यात आल्या असून प्रभाग निहाय अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक इमारती, वाणिज्य, चाळी, निष्कासनासाठी प्रत्येक प्रभागाकरीता १ वरीष्ठ लिपीक व ४ कनिष्ठ अभियंता याच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.
दिनांक ०७/११/२०२५ रोजी मा. आयुक्त साहेब, मा. अतिरिक्त आयुक्त साहेब उत्तर व दक्षिण, मा. उपायुक्त साहेब यांच्या निर्देशानुसार प्रभाग समिती "ए" हद्दीतील श्री गणेश इमारत G+३, डोंगरपाडा येथे अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण २०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - बी, हद्दीतील साई पूजा, प्रगती नगर येथे बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ७०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
- प्रभाग समिती सी, हद्दीतील श्री नित्यानंद माया वेल्फेअर सोसा. कोपरी, विरार (पू.) येथे अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण २८०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - डी हद्दीतील स.नं.०६, आचोळे येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ३५०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - ई, हद्दीतील नालासोपारा (प.) मुख्य रस्ता व मनोज अपार्ट. नालासोपारा (पू.) येथे अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ११६० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - एफ, हद्दीतील धानिव गावाच्या बाजूला अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ६५० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - जी, हद्दीतील मालजीपाडा येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण २६०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - एच हद्दीतील सर्वे नं.९०, माणिकपूर येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण २३५ चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
वरीलप्रमाणे वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत दिनांक ०७/११/२०२५ रोजी एकूण ११८४५ चौ. फुट अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे.
