वसई विरार शहर महानगरपालिका
अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मुलन विभाग
दि.०७/११/२०२५
वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत अनधिकृत बांधकाम निष्कासन करण्याकरीता मा. आयुक्त साो. यांच्या निर्देशानुसार विशेष पथक नेमणूक करण्यात आल्या असून प्रभाग निहाय अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक इमारती, वाणिज्य, चाळी, निष्कासनासाठी प्रत्येक प्रभागाकरीता १ वरीष्ठ लिपीक व ४ कनिष्ठ अभियंता याच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.
दिनांक ०६/११/२०२५ रोजी मा. आयुक्त साहेब, मा. अतिरिक्त आयुक्त साहेब उत्तर व दक्षिण, मा. उपायुक्त साहेब यांच्या निर्देशानुसार प्रभाग समिती "ए" हद्दीतील श्री गणेश इमारत G+३, डोंगरपाडा येथे अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ३०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आले.
प्रभाग समिती - बी, हद्दीतील साई पूजा, प्रगती नगर येथे बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ६०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - सी, हद्दीतील मनोहर इंडस्ट्रीज (G+३) पाचपायरी, विरार पूर्व येथे अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ८७०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - डी हद्दीतील आचोळे स्मशानभूमी समोर अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ६५०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - ई, हद्दीतील डाबरे अपार्ट. मुर्गी बाजार व मनोज अपार्ट. नालासोपारा (पू.) येथे अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ३९०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - एफ, हद्दीतील धानिव येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ९०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - जी, हद्दीतील ससुनवघर, वॉल्टन हॉटेल ते किनारा ढाबा येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ३३०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - एच हद्दीतील माणिकपूर, सर्वे नं.९० येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण २४० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
वरीलप्रमाणे वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत दिनांक ०६/११/२०२५ रोजी एकूण २४४४० चौ. फुट अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे.

