वसई विरार शहर महानगरपालिका अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभाग - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Monday, 3 November 2025

वसई विरार शहर महानगरपालिका अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभाग

 


वसई विरार शहर महानगरपालिका

अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभाग

दि.०३/११/२०२५



वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत अनधिकृत बांधकाम निष्कासन करण्याकरीता मा. आयुक्त साो. यांच्या निर्देशानुसार विशेष पथक नेमणूक करण्यात आल्या असून प्रभाग निहाय अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक इमारती, वाणिज्य, चाळी, निष्कासनासाठी प्रत्येक प्रभागाकरीता १ वरीष्ठ लिपीक व ४ कनिष्ठ अभियंता याच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.


दिनांक ३०/१०/२०२५, ते दि.०३/११/२०२५ रोजी मा. आयुक्त साहेब, मा. अतिरिक्त आयुक्त साहेब उत्तर व दक्षिण, मा. उपायुक्त साहेब यांच्या निर्देशानुसार प्रभाग समिती बी, तुळींज पोलीस स्टेशन ते यशवंत हाईट (फेरीवाला कारवाई), नीलकंठ अपा. बी विंग, मोरेगाव तलावाच्या शेजारी येथे अतिधोकादायक व अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ३६०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.


प्रभाग समिती - सी, रशीद कंपाऊड व गोकुळवाडा, वनोठा पाडा व जिवदानी कृपा चाळ (G+१) येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण १७४०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.


प्रभाग समिती - ई, महेश्वरी अपार्ट. (G+४) अलकापुरी, नालासोपारा (पू.), गणपती गल्ली, नालासोपारा (पू.) रेल्वे स्टेशन (५१०), महेश्वरी अपार्ट. (G+४) अलकापुरी, नालासोपारा (पू.) (३७००) येथे अतिधोकादायक व अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण १०२६० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.


प्रभाग समिती - एफ, हद्दीतील रिचर्ड कंपाऊंड व अवदुत आश्रम समोर, सोपारा फाटा अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ४९०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.


प्रभाग समिती - जी, हद्दीतील स.नं. ४, पाटील पाडा, चिंचोटी, बापाणे ब्रिज पासुन ते मालजीपाडा पर्यंत व चिंचोटी ते बाबपाणे व जुचंद्र (१ रूम २०० चौ. फुट) व मालजी पाडा ते आर्यन आग्री कट्टा हायवे पर्यंत अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण २०६०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.


प्रभाग समिती - आय, हद्दीतील रमेदी चर्च येथे अतिधोकादायक बांधकामावर व शेडवर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण १०५० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.


विशेष नियोजन प्राधिकरण विभाग, हद्दीतील मौजे टोकरे, मौजे खैरपाडा येथे अतिधोकादायक बांधकामावर व शेडवर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ९९०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्या आलेली आहे.


वरीलप्रमाणे वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत दिनांक ३०/१०/२०२५ ते  दि.०३/११/२०२५ या कालावधीत एकूण ६७७१० चौ. फुट अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची करवाई करण्यात आलेली आहे.

Home Admin Contact About
Home Admin Contact About