वसईकर फादर सायमन अल्मेडा यांची पुणे धर्मप्रांताच्या बिशप पदी निवड - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Sunday, 2 November 2025

वसईकर फादर सायमन अल्मेडा यांची पुणे धर्मप्रांताच्या बिशप पदी निवड

 


वसईकर फादर सायमन यांची पुणे धर्मप्रांताच्या बिशपपदी निवड


गास गावचे सुपुत्र व पुणे धर्म प्रांतात पस्तीस वर्षांपासून कार्यरत असलेले व लोकांचे धर्मगुरू म्हणून ख्यातकीर्त असलेले फादर सायमन जॉकी  आल्मेडा यांची पुणे धर्मप्रांताचे बिशप म्हणून पोप लिओ चौदावे यांनी नियुक्ती केलेली आहे .  मराठी व इंग्रजी भाषेवर  अभूतपूर्व प्रभुत्व असलेले फादर सायमन यांनी पुणे धर्म प्रांतात वेगवेगळ्या पदावर कार्य केलेले असून सध्या ते चर्चच्या पश्चिम विभागीय परिषदेच्या उप सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळत होते . मानसशास्त्र व समाजशास्र या विषयात त्यांनी परदेशी विद्यापिठात उच्च पदवी घेतलेली असून उत्तम संयोजक म्हणून त्यांचा लौकीक आहे . पुणे धर्मप्रांतामध्ये अर्थ प्रशासक म्हणून त्यांनी अनेक वर्ष जबाबदारी सांभाळली असून त्यांचा लोकसंग्रह अफाट आहे .  उत्तम प्रवचनकार व बायबलचे निरूपणकार म्हणून ते ओळखले जातात . महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यात विस्तार असलेला पुणे धर्मप्रांत हा देशातला अति महत्त्वाचा धर्मप्रांत समजला जातो .आरोग्य ,शिक्षण व समाजसेवेचं प्रचंड मोठं जाळं या विभागात पसरलेलं असून देशातल्या प्रसिद्ध अशा पेपल गुरुविद्यालयाचे कुलगुरू म्हणून देखील नवनियुक्त बिशप कार्य पाहतील . फादर सायमन यांचे ज्येष्ठ बंधू फादर पिटर आल्मेडा हे सध्या वसई धर्म प्रांतात कार्यरत आहेत .नवनियुक्त बिशपांच्या नेमणुकी निमित्ताने वसईचे बिशप थॉमस डिसोझा व फादर जॉन्सन मिनेजीस, फादर ग्रेग परेरा यांनी बिशपांच्या  गास येथील घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबांचे अभिनंदन केले.

Home Admin Contact About
Home Admin Contact About