मी अश्वत्थामा चिरंजीव लोकप्रिय महाकादंबरीची नववी आवृतीचे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या शुभहस्ते प्रकाशन....*
ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ यांच्या डिंपल पब्लिकेशन प्रकाशित "मी अश्वत्थामा चिरंजीव" कादंबरीच्या नवव्या आवृतीचे प्रकाशन शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी विरारच्या विवा कॉलेज येथे लोकनेते माननीय श्री.हितेंद्र ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी लोकनेते हितेंद्र ठाकूर म्हणाले की चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन माझ्या हस्ते करण्यात आले होते.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सीआयडी मालिका फेम शिवाजी साटम हे वसईत आले होते.
आज नवव्या आवृत्तीचे प्रकाशन करताना मला खरंच मोठाआनंद होत आहे.डिंपल पब्लिकेशनने आपल्या पन्नास वर्षाच्या वाटचालीत अनेक मान्यवर आणि वसईतील साहित्यिकांची दर्जेदार पुस्तकें प्रकाशित केली आहेत.
अशोक मुळे आणि अशोक समेळ हे माझे मित्र आहेत.त्यांनी महत्वाचे कार्य केले आहे. महाभारतातील नकारात्मक व्यक्ती चिरंजीव अश्वत्थामा यांच्या जीवनावर मोठी कादंबरी समेळ लिहिली आहे.आणि ती डिंपल पब्लिकेशन यांनी प्रकाशित केली आहे.हि ६८० पानाची कादंबरी वाचकांना खिळवून ठेवते.अशोक समेळ यांची प्रभावी आणि प्रवाही भाषा वाचकाना खिळवून ठेवते.
तिची लवकरच दहावी आवृत्ती प्रकाशित व्हावी.अशी माझी त्यांना सदिच्छा आहे.
बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते मुकेश सावे यांनीदेखील लिखाणाचे कौतुक केले आणि सदिच्छा दिल्या.या कार्यक्रमास अशोक समेळ उपस्थित होते.त्यांनी डिंपल पब्लिकेशन आणि रसिक वाचकांचे आभार मानले.
वसई समताचे संपादक ॲड.सुरेश कामत म्हणाले या कादंबरीने डिंपल पब्लिकेशनला प्रसिद्धीच्या वलयात नेऊन ठेवले आहे.वाचकांचीदेखील प्रथम पसंती या महाकांबरीला मिळाली आहे. तिची मांडणी आणि शैली खूपच सुंदर आहे. यावेळी सुप्रसिद्ध वकील ॲड.दिगंबर देसाई यांनी सांगितले की ही कादंबरी मी वाचली आहे.मला ती खूप आवडली आहे.माझ्या अशोक मुळे यांना शुभेच्छा आहेत.
नववी आवृतीची किंमत १००० रुपये असून आम्हीं वाचकांना ती ७०० रुपये सवलतीत देत आहोत असे कौतुक मुळे म्हणाले.
