*वसई-विरार शहरात सत्ताधारी राजकारण्यांच्या जुलमी कारभारा विरोधात प्रचंड आक्रोश मोर्चा आणि सत्याग्रह*
*मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत घेराव आंदोलनाची शक्यता*
वसई-विरार शहरात येत्या सोमवारी भारताचा मार्क्सवादी-लेनिनवादी लाल बावटा पक्षाच्या नेतृत्वाखाली प्रचंड आक्रोश मोर्चा आणि सत्याग्रह आंदोलन होणार आहे. या आंदोलनात पाच हजारांहून अधिक स्थानिक नागरिक सहभागी होणार असून, प्रशासनाने लोकांच्या मुलभूत मागण्या मान्य कराव्यात यासाठी तीव्र दबाव आणला जाणार आहे. *या मोर्चाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे प्रशासनाने सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करणे थांबवावे आणि कायदा व नियमांनुसार कार्यवाही करावी.*
काय आहेत मागण्या
1)स्थानिक युवकांना पालिकेत नोकरीची संधी द्यावी.
2) आदिवासी समाजाच्या राहत्या झोपडी वर कारवाई करणारे अधिकार्यांनवर तातडीने गुन्हा दाखल करा
3) विरार जकात नाका येथे शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याची स्थापना करावी.
4)पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी.
5)रस्त्यांची तातडीने दुरुस्ती आणि सुधारणा करावी.
6)आदिवासी समाजासाठी घरकुल योजना लागू करावी.
आदि मागण्यांचा समावेश आहे.
मोर्चाच्या निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन बेमुदत घेराव आंदोलनाच्या स्वरूपात सुरू राहील आणि त्याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील.या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे जिल्हा सहसचिव काॅम्रेड शेरू वाघ सह वसई तालुका कमिटी करणार आहे. सोशल मीडियावर या आंदोलनाबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, नागरिकांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे.
