वसई-विरार शहर महानगरपालिका
निवडणूक विभाग दि.१६/११/२०२५
*वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करीता अंतिम प्रभाग रचनेतील प्रत्येक प्रभागातील जागानिहाय आरक्षण प्रसिद्ध;*
*आरक्षणा बाबत हरकती व सूचना दि.२४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सादर करता येणार*
मा.राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या आदेशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता अंतिम प्रभाग रचनेतील प्रत्येक प्रभागातील जागानिहाय आरक्षण सोमवार दि.१७ नोव्हेंबर २०२५ रोजी महानगरपालिका मुख्यालय, महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे तसेच महानगरपालिकेच्या vvcmc.in या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यावर *दि.१७ नोव्हेंबर २०२५ ते २४ नोव्हेंबर २०२५* पर्यंत या कालावधीत नागरिकांना हरकती व सूचना सादर करता येतील. सदर हरकती व सूचना ह्या *आवक जावक विभाग (निवडणूक कार्यालय) तळमजला, वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय, विरार (प.)* येथे तसेच महानगरपालिकेच्या *सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये* कार्यालयीन वेळेत सादर करता येतील.
