वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Friday, 21 November 2025

वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

 


वसई -विरार शहर महानगरपालिका

निवडणूक विभाग

दि :- १९/११/२०२५



*वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध;*

*प्रारूप मतदार यादीवर दि.२७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार*


वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता मतदार यादी तयार करण्याच्या अनुषंगाने मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये *प्रारुप मतदार यादी ही दि.२०/११/२०२५ रोजी प्रसिध्द* करण्यात येत असुन सदर प्रारुप मतदार यादी *वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय व सर्व प्रभाग समिती कार्यालय* येथे उपलब्ध आहेत. सदर प्रारुप मतदार यादीवर *हरकती व सुचना* मा. राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार *दि.२०/११/२०२५ ते २७/११/२०२५ पर्यत* घेणेत याव्या याबाबत निर्देश आहेत.


त्या अन्वये नागरीकांना सदर प्रारुप मतदार यादीवर हरकत व सुचना घ्यावयाच्या असल्यास या बाबत हरकती व सुचना (तक्रार) मा.राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या *नमुना अ व नमुना-ब* मध्ये घेण्यात येतील. नमुना - अ व नमुना - ब *वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय व सर्व प्रभाग समिती कार्यालय तसेच महानगरपालिकेच्या www.vvcmc.in या अधिकृत संकेत स्थळावर* उपलब्ध आहे. या दिलेल्या कार्यक्रमानुसार हरकत व सुचना *कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय व प्रभाग समिती कार्यालय येथे नमुना अ व नमुना -ब द्वारे लेखी स्वरुपात देता येतील.*

Home Admin Contact About
Home Admin Contact About