वसई विरार शहर महानगरपालिका अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभाग - Vasai live Marathi news
📢 यह टेक्स्ट केवल Admin द्वारा संपादित किया जा सकता है।
📢 Breaking News: यहाँ Admin जो चाहे लिख सकता है — बाकी कोई नहीं बदल सकता।
📢 यहाँ पर अपना मैसेज लिखें — Breaking News, Event, या Announcement!
🔄 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...
🔴 Vasai Live News - अब सच्‍ची खबरें मिलेंगी आपकी अपनी वेबसाइट और YouTube चैनल पर! जुड़े रहिए सच्चाई के साथ! 🔴
✨ वसई लाईव्ह न्यूज संपर्क क्रमांक 9890188174✨

Friday, 10 October 2025

वसई विरार शहर महानगरपालिका अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभाग


 वसई विरार शहर महानगरपालिका

अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभाग

दि.११/१०/२०२५


वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत अनधिकृत बांधकाम निष्काशन करण्याकरीता मा. आयुक्त साो. यांच्या निर्देशानुसार विशेष पथक नेमणूक करण्यात आल्याअसून प्रभाग निहाय अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक इमारती, वाणिज्य, चाळी, निष्कासनासाठी प्रत्येक प्रभागाकरीता १ वरीष्ठ लिपीक व ४ कनिष्ठ अभियंता याच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.


- दिनांक १०/१०/२०२५ रोजी मा. आयुक्त साहेब, मा. अतिरिक्त आयुक्त साहेब उत्तर व दक्षिण, मा. उपायुक्त साहेब यांच्या निर्देशानुसार प्रभाग समिती ए, हद्दीतील दिशा अपा., एम.बी. इस्टेट, विरार (प.) येथे अतिधोकादायक व अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ४०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.


प्रभाग समिती - बी, हद्दीतील निळकंठ इमा. बजरंग नगर, मोरेगाव तलावाजवळ येथे अतिधोकादायक व अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ४०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.


प्रभाग समिती - सी, हद्दीतील चंदनसार, HDIL च्या मागे, विरार (पू.) व साईदत्त झोपडपट्टी येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ३२०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.


प्रभाग समिती - ई, हद्दितील म्हाडा रोड, संकटमोचन हनुमान मंदिर, विरार प. येथे अनधिकृत शेडवर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण २०० चौ. फुट करण्यात निष्कासन करण्यात आले.


प्रभाग समिती - एफ, हद्दीतील सोपारा फाटा ते धानिव बाग येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ७००० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.


प्रभाग समिती - जी, हद्दीतील तुंगारेश्वर अॅकॅडमी शाळा ते वसई फाटा विरूध्द बाजूला असलेल्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ४८५९३ चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.


प्रभाग समिती आय, हद्दीतील राजानी इमारत, वसई गाव येथे अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ३५० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.


विशोष नियोजन प्राधिकरण, हद्दीतील खैरपाडा येथे अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ४०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.


वरिल प्रमाणे वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत दि.१०/१०/२०२५ रोजी एकूण ६०५४३ चौ. फुट अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची करवाई करण्यात आलेली आहे.