पालघर जिल्हा परिषद निवडणुकीची मतदार यादी जाहीर - Vasai live Marathi news
📢 यह टेक्स्ट केवल Admin द्वारा संपादित किया जा सकता है।
📢 Breaking News: यहाँ Admin जो चाहे लिख सकता है — बाकी कोई नहीं बदल सकता।
📢 यहाँ पर अपना मैसेज लिखें — Breaking News, Event, या Announcement!
🔄 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...
🔴 Vasai Live News - अब सच्‍ची खबरें मिलेंगी आपकी अपनी वेबसाइट और YouTube चैनल पर! जुड़े रहिए सच्चाई के साथ! 🔴
✨ वसई लाईव्ह न्यूज संपर्क क्रमांक 9890188174✨

Friday, 10 October 2025

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीची मतदार यादी जाहीर

 


*पालघर जिल्हा परिषद निवडणुकीची मतदार यादी जाहीर* 

 

*१४ ऑक्टोबरपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत*




पालघर, दि. १० ऑक्टोबर :  राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार (क्र. रानिआ/जिपपंस-२०२५/प्र.क्र.२०/का-०७, दि. २३ सप्टेंबर २०२५) पालघर जिल्हा परिषद व आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.


या कार्यक्रमानुसार, निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. नागरिकांना या यादीतील नावे, तपशील इत्यादी तपासण्याची संधी देण्यात आली असून हरकती व सूचना १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत दाखल करता येतील


यानंतर, प्राप्त हरकतींची पडताळणी करून अंतिम व अधिप्रमाणित मतदार यादी तसेच मतदान केंद्रनिहाय यादी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.


प्रारूप मतदार याद्या जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद कार्यालय, पालघर येथे नोटीस बोर्डवर उपलब्ध आहेत. याशिवाय, नागरिकांच्या सोयीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर — https://mahasecvoterlist.in — “Download Voter List” या विभागात PDF स्वरूपात फोटो विरहित यादी डाउनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


ज्या नागरिकांना त्यांच्या नावाविषयी किंवा इतर नोंदींविषयी हरकती अथवा सूचना सादर करावयाच्या आहेत, त्यांनी त्या राज्य निवडणूक आयोगाच्या १६ जुलै २०२५ च्या आदेशातील नमुना-अ (मतदारांसाठी) व नमुना-ब (तक्रारदारांसाठी) या फॉर्ममध्ये संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.