दि.१५ नोव्हेंबर २०२५ पासून वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत शेअर रिक्षा सोबतच मीटर रिक्षा सुरू होणार वसईच्या संघर्षकन्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांची मागणी मान्य - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Monday, 13 October 2025

दि.१५ नोव्हेंबर २०२५ पासून वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत शेअर रिक्षा सोबतच मीटर रिक्षा सुरू होणार वसईच्या संघर्षकन्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांची मागणी मान्य

 




*वसई-विरारकरांना दिलासा!*

*दि. १५ नोव्हेंबर २०२५ पासून वसई-विरार महानगरपालिकेच्या हद्दीत शेअर रिक्षा सोबतच मीटर रिक्षा सुरू होणार— वसईच्या संघर्षकन्या आमदार मा. स्नेहा दुबे पंडित यांची मागणी मान्य*



           वसई-विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि अपुऱ्या सार्वजनिक वाहन व्यवस्थेमुळे येथील नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी रिक्षावर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र, संपूर्ण वसई विरार शहरात अद्यापही मीटर रिक्षा नसल्याने शेअर रिक्षाशिवाय अन्य पर्याय राहीलेला नाही. त्यातच शेअर रिक्षा सेवेच्या मनमानी भाडे आकारणे तसेच फक्त मुख्य रस्त्यावर शेअर रिक्षा चालणे यामुळे वयोवृध्द नागरिक, महीला, विद्यार्थी यांना वसहातीतील आतील भागामध्ये जाण्यासाठी पायी चालत जावे लागते. बऱ्याच वेळा सामानासह पायी चालत जाणे नागरिकांना अडचणीचे होत असते. 



      मीटर रिक्षाच्या समस्येबरोबरच शहरामध्ये वाहनांची पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून वसई -नालासोपारा-विरार या स्थानकांच्या बाहेरच्या भागात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. 



वरील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी आमदार मा. स्नेहा दुबे पंडित यांनी मा. मुख्यमंत्री तसेच मा. उपमुख्यमंत्री, नगरविकास आणि मा. परिवहन मंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. 



      यासंदर्भात आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांच्‍या मागणीनुसार आज दि. 13/10/2025 रोजी मा. परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक साहेब यांनी मंत्रालयामध्ये एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आमदार मा. स्नेहा दुबे पंडित यांच्यासह वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त मा. मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त परिवहन अधिकारी भरत कळसकर, महाव्यवस्थापक (MSRTC) मा. दिनेश महाजन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वसई मा. सोनाली सोनार, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त मा. अशोक विरकर, अतिरिक्त पालिका आयुक्त मा. दिपक सावंत हजर होते. 



       या बैठकीमध्ये वसईतील वाहन पार्किंगची समस्या आणि मीटर रिक्षा यावर सविस्तर चर्चा झाली या चर्चेअंती मा. परिवहन मंत्री महोदय यांनी दि. 15/11/2025 रोजी पासून वसई विरार शहरात मीटर रिक्षा सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसेच पार्किंगची व्यवस्था करण्याचे व वसईतील एस.टी. महामंडळाच्या जागेचा पी.पी.पी. तत्वावर विकास करून त्याठिकाणी वाहनतळ व इतर सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी डिसेंबर अखेर पूर्वी त्याबाबतचा आराखडा सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 



*आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित जनसंपर्क कार्यालय वसई पश्चिम.*

Home Admin Contact About
Home Admin Contact About