वसई विरार शहर महानगरपालिका
अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मुलन विभाग
दि.०६/१०/२०२५
वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत अनधिकृत बांधकाम निष्काशन करण्याकरीता मा. आयुक्त साो. यांच्या निर्देशानुसार विशेष पथक नेमणूक करण्यात आल्याअसून प्रभाग निहाय अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक इमारती, वाणिज्य, चाळी, निष्कासनासाठी प्रत्येक प्रभागाकरीता १ वरीष्ठ लिपीक व ४ कनिष्ठ अभियंता याच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.
दिनांक ०४/१०/२०२५, दि.०५/१०/२०२५ व दि.०६/१०/२०२५ रोजी मा. आयुक्त साहेब, मा. अतिरिक्त आयुक्त साहेब उत्तर व दक्षिण, मा. उपायुक्त साहेब यांच्या निर्देशानुसार प्रभाग समिती ए, हद्दितील दिशा अपार्टमेंट, एम.बी. इस्टेट अति धोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण १३०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आले.
प्रभाग समिती बी, हद्दितील निळकंठ इमारत, बजरंग नगर, मोरेगाव तलावा जवळ अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली असून एकुण ६०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - सी, हद्दितील रमाबाई इमारत, ओ-विंग, विरार पूर्व येथे अति धोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ८२०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - एफ, हद्दितील पेल्हार पोलीस स्टेशन ते वसई फाटा (नॅशनल हायवे) येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण १२००० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती जी, हद्दितील गणेश नगर, तुंगारेश्वर रोड, सातिवली येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ३७०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
वरिल प्रमाणे वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत दि.०४/१०/२०२५, दि.०५/१०/२०२५ व दि.०६/१०/२०२५ रोजी एकूण २५८०० चौ. फुट अनधिकृत बांधकाम व अति धोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे.