वसई विरार शहर महानगरपालिका
क्रीडा विभाग
दि.१०/१०/२०२५
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद पालघर व वसई विरार शहर महानगरपालिकाद्वारे आयोजित विविध स्पर्धा महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात सुरू आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 07/10/2025 ते दिनांक 09/10/2025 पर्यंत शालेय 14 वर्षे, 16 वर्षे व 19 वर्षे मुले, मुली यांचे कबड्डी स्पर्धेचे आयोजन महानगरपालिकेतील खुला रंगमंच हॉल, छेडा नगर, पेट्रोल पंप जवळ, नालासोपारा पश्चिम येथे करण्यात आले होते.
सदर कबड्डी स्पर्धा दिनांक 09/10/2025 रोजी यशस्वीरित्या पार पडली. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला गोल्ड मेडल, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला सिल्वर मेडल व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला ब्राँझ मेडल देऊन गौरविण्यात आले.
उपरोक्त कार्यक्रमात महानगरपालिका क्रीडा विभागातील माननीय उप आयुक्त श्री. अजित मुठे साहेब, महानगरपालिकेतील क्रीडा समन्वयक व कर्मचारी उपस्थित होते. तसेच शालेय क्रीडा समिती मधील प्रमुख , सभासद, सल्लागार शिक्षक उपस्थित होते.
सदर स्पर्धा सर्वांचे सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली.