*वसई विधानसभेच्या संघर्षकन्या आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या विकास कामाच्या ध्यासाला शासनाचे पाठबळ !*
*वसई विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल ४ कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर*
वसई तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सतत धडपड करणाऱ्या संघर्षकन्या आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य सरकारकडून तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीअंतर्गत वसई विधानसभा मतदारसंघातील पर्यटन, रस्ते, समाजमंदिरे, शौचालये, पेव्हर ब्लॉक्स, रॅम्प, प्रतिक्षालये आणि सामाजिक सुविधांच्या उभारणीसाठी विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
ही मंजुरी वसईच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२५-२०२६ अंतर्गत मंजूर कामे (एकूण निधी ₹ २ कोटी)
वसईतील पर्यटन क्षेत्र विकसित करून स्थानिकांना रोजगार निर्मितीची संधी मिळावी आणि येथील समुद्रकिनारे अधिक आकर्षक व सुसज्ज व्हावेत, या उद्दिष्टाने खालील कामांना मंजुरी देण्यात आली आहे - (१)ग्रामपंचायत अर्नाळा अंतर्गत वटार येथे समुद्रकिनारी पर्यटनस्थळी रॅम्प बांधणे.(२) ग्रामपंचायत अर्नाळा अंतर्गत समुद्रकिनारी विसर्जन घाट, प्रतिक्षालय व शौचालय बांधणे.(३)ग्रामपंचायत कळंब अंतर्गत राजोडी चार रस्ता ते भट्टेवाडी टर्फपर्यंत रस्ता तयार करणे.(४) ग्रामपंचायत कळंब अंतर्गत विसर्जन घाट बांधणे.(५) ग्रामपंचायत कळंब अंतर्गत समुद्रकिनारी वाहनतळ, प्रतिक्षालय व शौचालय बांधणे.(६)ग्रामपंचायत कळंब अंतर्गत समुद्रकिनारी रॅम्प बांधणे.(७) ग्रामपंचायत कळंब अंतर्गत भुईगांव येथील उतरता धक्का ते ब्रम्हेश्वर मंदिरापर्यंत रस्ता तयार करणे.
ही कामे पूर्ण झाल्यानंतर वसई परिसरातील पर्यटनाला नवा चेहरा मिळेल.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना २०२५-२०२६ अंतर्गत मंजूर कामे (एकूण निधी ₹२ कोटी)
समाजातील सर्व घटकांचा विकास, नागरिकांच्या मूलभूत सुविधांची उभारणी आणि समाजमंदिरांसारख्या सामाजिक बांधकामांच्या उभारणीसाठी मंजूर कामे —(१) ग्रामपंचायत सत्पाळा अंतर्गत भीमनगर येथे समाज मंदिर व रंगमंच बांधणे.(३) ग्रामपंचायत सत्पाळा अंतर्गत आर.सी.सी. गटार बांधणे.(३)ग्रामपंचायत रानगांव अंतर्गत पंचशील नगर येथे शौचालय बांधणे.(४) ग्रामपंचायत रानगांव अंतर्गत पंचशील नगर व पाटीलवाडी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.(५) ग्रामपंचायत कळंब अंतर्गत वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच रस्ता व संरक्षक भिंत बांधणे.(६) ग्रामपंचायत पोमण अंतर्गत मोरी सम्राटनगर येथे समाज मंदिर व शौचालय बांधणे तसेच रस्ते व पेव्हर ब्लॉक बसविणे.(७) ग्रामपंचायत चंद्रपाडा हद्दीतील स्मशानभूमी ते बुद्ध विहारपर्यंत रस्ता तयार करणे.(८)प्रभाग समिती – आय अंतर्गत वसई सिद्धार्थ नगर येथे बुद्ध स्मारकावर शेड बांधणे व आंबेडकर शेडचे नूतनीकरण करणे.(९)प्रभाग समिती – आय अंतर्गत उमेळा साकाई नगर २ येथे एकवीरा आई मंदिर ते हेमंत घाट यांच्या घरापर्यंत रस्ता तयार करणे.(१०) प्रभाग समिती – डी मध्ये बुद्ध विहारासमोर समाज मंदिर बांधणे.(११) प्रभाग समिती – डी मध्ये संत जलाराम बापू नगर येथे शौचालय बांधणे.(१२) प्रभाग समिती – ई मध्ये आगाशी आंबेडकर नगर अंतर्गत रस्ता तयार करणे.
या कामांमुळे वसईतील विविध भागांमध्ये सामाजिक, धार्मिक व पायाभूत विकासास नवे बळ मिळणार आहे.
या दोन्ही योजनांअंतर्गत मंजूर झालेल्या कामांबद्दल आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार साहेब, तसेच संपूर्ण महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
या संदर्भात बोलताना ताई म्हणाल्या —“वसईच्या सर्वांगीण विकासासाठी माझा प्रत्येक श्वास झटत आहे. नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, वसईचा पर्यटन व सामाजिक विकास वेगाने व्हावा, हेच माझे ध्येय आहे. या मंजुरीमुळे वसईत नव्या विकासयुगाची सुरुवात होईल.”
