वसई : नानभाट-सोपारा रोडवर ट्रकचा अपघात, सात विद्युत खांब कोसळले — माजी नगरसेवक मार्शल लोपीस यांनी तत्परतेने घेतली पाहणी
प्रतिनिधी, वसई
आज नानभाट-सोपारा रोडवर रॉयल आंबीन्स हॉटेल ते उकांदा या मार्गावर एका ट्रकने धडक दिल्याने तब्बल सात विद्युत पोल कोसळले. या अपघातामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आणि नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक मार्शल लोपीस यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महावितरणचे अधिकारी श्री. करांडे साहेब आणि किणी साहेब यांच्याशी संपर्क साधून नवीन पोल मागविण्याची कार्यवाही तत्काळ सुरू केली. सध्या नव्या पोलचे काम युद्धपातळीवर सुरू असून, महावितरणचे अधिकारी तसेच माजी नगरसेवक स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून कामाचे मार्गदर्शन करत आहेत.
स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक मार्शल लोपीस आणि महावितरण अधिकाऱ्यांचे तत्पर प्रतिसाद व वेगवान कारवाईबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
घटना: नानभाट-सोपारा रोड, रॉयल आंबीन्स ते उकांदा मार्गावर
उपस्थित: माजी नगरसेवक मार्शल लोपीस, MSEB अधिकारी श्री. करांडे, श्री. किणी

