महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पालघर जिल्ह्याचा गौरव - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Monday, 20 October 2025

महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पालघर जिल्ह्याचा गौरव

 


*आदि कर्मयोगी अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालघर जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार* 


 *महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांच्या उपस्थितीत पालघर जिल्ह्याचा गौरव*



पालघर दिनांक 20 ऑक्टोबर : आदि कर्मयोगी अभियान” अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पालघर जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान महामहीम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू   यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला असून, जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकास कार्याची ही दखल मानली जात आहे.


या यशामागे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे नेतृत्व,जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  मनोज रानडे यांचे प्रभावी मार्गदर्शन तसेच प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर (जव्हार प्रकल्प) आणि प्रकल्प अधिकारी  विशाल खत्री (डहाणू प्रकल्प) यांचे समन्वयपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरले.


या अभियानात जिल्ह्यातील विविध Line Department चे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच दोन्ही प्रकल्प कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रमपूर्वक योगदान दिले. विशेषतः आदि कर्मयोगी, आदि सहयोगी आणि आदि साथी यांच्या अथक परिश्रमामुळे पालघर जिल्ह्याने हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे.


या यशामुळे पालघर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान वाढला असून, जिल्हा प्रशासनाने लोकाभिमुख उपक्रमांद्वारे आदिवासी भागांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न आता देशपातळीवर आदर्श ठरत आहेत.

पालघर जिल्ह्याचा हा सन्मान म्हणजे टीमवर्क, प्रामाणिक सेवा आणि जनहिताच्या कार्याचा  गौरव आहे.

Home Admin Contact About
Home Admin Contact About