*पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न*
*जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ७९९ कोटींचा आराखडा जाहीर*
*पालकमंत्री गणेश नाईक*
पालघर, दि. १५ ऑक्टोबर : पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकूण रु. ७९९.४३ कोटींच्या वार्षिक योजनेचा आराखडा निश्चित करण्यात आला असून २५ ऑक्टोबरपर्यंत सर्व विभागांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत येणारे प्रस्ताव सादर करावे असे निर्देश वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखना दिले.
वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली .
या बैठकीस आ. राजेंद्र गावीत,आ. हरिश्चंद्र भोये, आ. स्नेहा दुबे-पंडित,,आ. विनोद निकोले , आ. दौलत दरोडा, आ. शांताराम मोरे, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, वसई-विरार मनपा आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे तसेच जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत २१ जुलै २०२५ रोजी झालेल्या मागील बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देण्यात आली. असून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आदिवासी घटक कार्यक्रमासाठी रु. ४१०.१३ कोटी रुपये देण्यात आले आहे.
सर्वसाधारण घटकासाठी रु. ३७५.०० कोटी,
तसेच विशेष घटकासाठी रु. १४.०० कोटी,
असा एकूण रु. ७९९.४३ कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
यापैकी रु. १३८.९६ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून, शासनाकडून वितरित ३०% निधीमधून रु. ६२.३५ कोटी रक्कम खर्चासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांनी सर्व विभागांना दि. २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत कामांचे परीपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
तसेच, मागील वर्षातील मंजूर कामांवरील उर्वरित दायित्व निधीला मंजुरी देऊन ती कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देखील पालकमंत्री गणेश नाईक यांनी केल्या.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गालतरे (वाडा), सदानंद महाराज देवस्थान (वसई), पद्मनाभम स्वामी मंदिर (पालघर), शितलादेवी मंदिर (केळवा), शिवमंदिर (देहरे-जव्हार), गातेस मंदिर (वाडा) आणि चंडीकादेवी मंदिर (जुचंद्र-वसई) या सात मंदिरांना क वर्ग तीर्थक्षेत्र / यात्रास्थळाचा दर्जा निकष तपासून मिळणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.