वसई विरार शहर महानगरपालिका
अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभाग
दि.१४/१०/२०२५
वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत अनधिकृत बांधकाम निष्काशन करण्याकरीता मा. आयुक्त साो. यांच्या निर्देशानुसार विशेष पथक नेमणूक करण्यात आल्याअसून प्रभाग निहाय अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक इमारती, वाणिज्य, चाळी, निष्कासनासाठी प्रत्येक प्रभागाकरीता १ वरीष्ठ लिपीक व ४ कनिष्ठ अभियंता याच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.
- दिनांक ११/१०/२०२५ ते दिनांक १३/१०/२०२५ रोजी मा. आयुक्त साहेब, मा. अतिरिक्त आयुक्त साहेब उत्तर व दक्षिण, मा. उपायुक्त साहेब यांच्या निर्देशानुसार प्रभाग समिती ए, हद्दीतील दिशा अपा. एम. बी. इस्टेट, विरार (प.) येथे अतिधोकादायक व अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ६०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - बी, हद्दीतील मोरेगांव नगीनदास पाडा, कांचन हायस्कुल ज्ञानदिप विद्यालय, मोरेश्वर विद्यालय व निळकंठ इमा. बजरंग नगर, मोरेगाव तलावाजवळ येथे अतिधोकादायक व अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ११०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - डी, हद्दीतील नवघर इंडस्ट्रिीयल वसई पुर्व होली फॅमेली ब्रॉडवे तसेच गाला नगर येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण २२२ चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती ई, हद्दितील निर्मल शाळेजवळील तसेच होळी क्रॉस शाळेजवळ येथे अनधिकृत शेडवर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण २१५ चौ. फुट करण्यात निष्कासन करण्यात आले.
प्रभाग समिती - एफ, हद्दीतील जाबर पाडा येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण २२०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - जी, हद्दीतील वसई फाटा, सातीवली रोड तसेच ज्युचंद्र व भोयदापाडा रोड, राजावली, पालनगर गोखीवरे, तलाव रोड, एवरशाईन रोड व चिंचोटी ब्रीज पासून ते बापाणे ब्रीज येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण १५३२० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - एच, हद्दीतील सेट अगस्टीन स्कुल, उमेळमान येथे अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण २२५ चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - आय, हद्दीतील राजानी इमारत, वसई गाव व रमेदी येथे अतिधोकादायक बांधकामावर व शेडवर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ६५० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
वरिल प्रमाणे वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत दिनांक ११/१०/२०२५ ते दिनांक १३/१०/२०२५ रोजी एकूण २०५३२ चौ. फुट अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे.