विरार वैतरणा दरम्यान भीषण अपघात पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Thursday, 26 March 2026

विरार वैतरणा दरम्यान भीषण अपघात पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत



विरार - वैतरणा दरम्यान भीषण अपघात ; पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत 

वसई:-विरार आणि वैतरणा स्थानकादरम्यान हफसफर एक्सप्रेससमोर अचानक एक अज्ञात व्यक्ती आल्याने भीषणअपघात घडला. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.हा मृतदेह इंजिन समोरच्या जाळीत अडकल्याने एक्सप्रेस मध्येच थांबवावी लागली. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

संबधीत व्यक्ती गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास रेल्वे रूळ ओलांडून जात असताना हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. धडक इतकी भीषण होती की, सदर व्यक्तीचा मृतदेह इंजिनच्या गार्डला (जाळी) अडकला. त्यामुळे गाडी चालकाने तातडीने ब्रेक लावून गाडी थांबवली.​या अपघातामुळे डहाणू आणि गुजरातकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या खोळंबल्या, तर मुंबई उपनगरीय लोकल सेवेवरही त्याचा मोठा परिणाम झाला. कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचा याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत जाळीत अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला.त्यानंतर तांत्रिक तपासणी नंतर रेल्वे वाहतूक सेवा पूर्ववत झाली. या घटनेमुळे सुमारे एक तासभर रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.

मृतदेह ताब्यात घेतला अजूनही त्याची ओळख पटलेली नाही. नेमका हा अपघात आहे की आत्महत्या याचा तपास सुरू असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

Home Admin Contact About
Home Admin Contact About