महापौर अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक स्वच्छता दूतांना स्मार्ट वॉच चे वितरण - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Tuesday, 10 February 2026

महापौर अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक स्वच्छता दूतांना स्मार्ट वॉच चे वितरण

 


महापौर अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक; स्वच्छता दूतांना स्मार्ट वॉचचे वितरण

वसई : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज मंगळवार, दिनांक १० फेब्रुवारी रोजी महानगरपालिका मुख्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. ही बैठक महापौर मा. श्री. अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत महापालिकेच्या विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती घेण्यात आली. शहरातील नागरी सुविधा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि वेळेत नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले. तसेच प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.

आढावा बैठकीनंतर शहर स्वच्छता व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता दूतांना स्मार्ट वॉचचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कामकाज अधिक सुसूत्र, वेळेचे नियोजनबद्ध आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले. स्वच्छता दूतांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या बैठकीस माजी महापौर प्रवीण शेट्टी, उपमहापौर मार्शल लोपीस, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त दिपक सावंत, नगरसेवक प्रफुल्ल साने, तसेच विविध उपायुक्त, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शहर विकास आणि स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली असून प्रशासनाने कामकाजात गती आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

Home Admin Contact About
Home Admin Contact About