आगामी निवडणुकीचे कामकाज व प्रभाग समिती कार्यालयातील विविध विषयासंदर्भात प्रभाग कार्यालयास भेट देऊन मा. आयुक्त महोदयांनी घेतला आढावा - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Friday, 5 December 2025

आगामी निवडणुकीचे कामकाज व प्रभाग समिती कार्यालयातील विविध विषयासंदर्भात प्रभाग कार्यालयास भेट देऊन मा. आयुक्त महोदयांनी घेतला आढावा

 


वसई-विरार शहर महानगरपालिका

दि.०५/१२/२०२५



*आगामी निवडणुकीचे कामकाज व प्रभाग समिती कार्यालयांतील विविध विषयांसंदर्भात प्रभाग कार्यालयास भेट देऊन मा. आयुक्त महोदयांनी घेतला आढावा*


वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगीक कामांबाबत तसेच प्रभाग समित्यांमधील विविध विषयांसंदर्भात दि.०५ डिसेंबर रोजी मा.आयुक्त श्री. मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) महोदयांनी प्रभाग समिती 'बी' नालासोपारा, प्रभाग समिती 'डी' आचोळे, प्रभाग समिती 'जी' वालीव या ठिकाणी पाहणी दौरा करून विविध बाबींचा आढावा घेतला.


वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने निवडणुकीची तयारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकरिता प्रभाग निहाय कार्यालय निश्चित करणे, मतदान साहित्य वाटप व जमा करून घेणे, मतमोजणी च्या जागा निश्चित करणे इ. निवडणुकीविषयीचा कामांबाबत सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली. प्रभागातील मतदार याद्या मा.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे वेळीच अद्ययावत करण्याच्या सूचना मा.आयुक्त महोदयांनी बैठकीत कर्मचाऱ्यांना दिल्या. याचबरोबर प्रभागांतील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांविषयी सुरु असलेली कारवाई, कर वसुली, स्वच्छतेविषयीची कामे, विविध विकासकामे इ. विविध विषयांचा आढावा यावेळी मा.आयुक्त महोदयांनी घेतला. प्रभागातील प्रलंबित कामे वेळीच पूर्ण करणेच्या तसेच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने नेमून दिलेली कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी मा. आयुक्त महोदयांनी दिल्या.


या बैठकीवेळी मा. अतिरिक्त आयुक्त श्री. संजय हेरवाडे, प्र.शहर अभियंता श्री. प्रदीप पाचंगे, प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त, प्रभाग अधीक्षक, विभाग प्रमुख, अभियंते व प्रभाग निहाय कर्मचारी उपस्थित होते.

Home Admin Contact About
Home Admin Contact About