वसई विरार शहर महानगरपालिके मार्फत दिनांक १७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत जनजागृती रॅली सोबत रेबीज नियंत्रण उपक्रम राबविण्यात येणार आहे - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Sunday, 14 December 2025

वसई विरार शहर महानगरपालिके मार्फत दिनांक १७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत जनजागृती रॅली सोबत रेबीज नियंत्रण उपक्रम राबविण्यात येणार आहे


 वसई विरार शहर महानगरपालिका

दि.१५/१२/२०२५


*वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत दि.१७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत जनजागृती रॅली सोबत रेबीज नियंत्रण उपक्रम राबविण्यात येणार*

   

वसई विरार शहर महानगरपालिका आणि पशुसंवर्धन विभाग, वसई तसेच मे.मिशन रेबीज या संस्थेच्या सहकार्याने वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात भटक्या श्वानांसाठी मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त श्वानांचे लसीकरण व जनजागृती सुरु करण्यात आली आहे. याच  अनुषंगाने वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये मिशन रेबीज या संस्थेमार्फत *दि.१७ डिसेंबर ते दि.२० डिसेंबर २०२५* या कालावधीत *रेबीज जागरुकता प्रभाग फेरी (Rally)* आयोजित करण्यात आली आहे. मोबाईल शिक्षणाद्वारे समुदायाला शिक्षित करणे, रेबीज विषयी जागरूक समुदाय तयार करणे, रेबीज पासून स्वतःचे संरक्षण करणे, रेबीज नियंत्रण प्रयत्नांना पाठींबा देणे, श्वान दंश टाळण्यासाठी, रेबीज टाळण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी आवश्यक ज्ञानाने लोकांना सुसज्ज करणे तसेच महानगरपालिका क्षेत्र रेबीज मुक्त करणे हे महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे.

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या या रेबीज जागरुकता प्रभाग फेरी (Rally) मध्ये स्थानिक समुदाय, प्राणी प्रेमी, प्राणी प्रेमी संस्था यांच्यासह सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपले शहर रेबीज मुक्त करण्यात सहकार्य करावे असे आवाहन वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.


*रेबीज जागरुकता प्रभाग फेरी (Rally) खालीलप्रमाणे काढण्यात येईल.*

१) दिनांक *१७.१२.२०२५* रोजी, सकाळी *१०.००* वाजता – *वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय, विरार (प.)* ते विवा महाविद्यालय, विरार (प.)


२) दिनांक *१८.१२.२०२५* रोजी, सकाळी *०९.००* वाजता – *प्रभाग समिती ‘एच’ नवघर- माणिकपूर,वसई (प.)* ते वर्तक महाविद्यालय मैदान, वसई (प.)

       तसेच *बाईक रॅली* – दि.*१०.३०* वाजता - *प्रभाग समिती ‘एच’ नवघर-माणिकपूर, वसई (प.)* ते  शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना, वसई (प.) 


३) दिनांक *१९.१२.२०२५* रोजी, सकाळी *०९.००* वाजता – *आचोळे तलावजवळ, नालासोपारा(पु.)* ते कपोल महाविद्यालय


४) दिनांक *२०.१२.२०२५* रोजी, सकाळी *०९.००* वाजता – *जुचंद्र नाका, नायगाव (पूर्व)* ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, जुचंद्र आणि सह्याद्री शिक्षण सेवा मंडळ शाळा व महाविद्यालय, जुचंद्र, नायगाव (पूर्व)

Home Admin Contact About
Home Admin Contact About