वसई-विरार शहर महानगरपालिका
निवडणूक विभाग दि.१५/१२/२०२५
*वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध*
मा.राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या निर्देशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२५ करिता *प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी* दि.१५ डिसेंबर, २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून सदर प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी *वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय* व *सर्व प्रभाग समिती कार्यालय* येथे उपलब्ध आहे. तसेच महानगरपालिकेच्या *vvcmc.in* या अधिकृत संकेतस्थळावरही सदरील प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तरी कृपया नागरिकांनी याची नोंद घ्यावी.
निवडणूक विभाग
वसई विरार शहर महानगरपालिका
