*वसई-विरार शहर महानगरपालिका*
दि.२६/११/२०२५
*वसई विरार शहर महानगरपालिकेत संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत सामुहिक वाचन*
"घर घर संविधान" कार्यक्रमांतर्गत दि. २६ नोव्हेंबर "संविधान दिनानिमित्त" आज दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय तसेच सर्व प्रभाग समिती कार्यालये तसेच महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालये येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले, त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे उपस्थितांमार्फत सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. "घर घर संविधान” या कार्यक्रमांद्वारे संविधानाचे महत्व, त्यातील मुल्ये याबद्दल समाजातील सर्व घटकात जागरुकता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महानगरपालिका मुख्यालयाप्रमाणेच सर्व प्रभाग समिती कार्यालये येथेही संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालये येथेही संविधान दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शिक्षक-विद्यार्थ्यांमार्फत संविधान दिनानिमित्त भारतीय घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबाबत जागरुकता वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
