वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत ०३ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविली - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Thursday, 27 November 2025

वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत ०३ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविली

 


वसई-विरार शहर महानगरपालिका 

निवडणूक विभाग 

                                                             दि.२७/११/२०२५     


*वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत ०३ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविली*


                      मा.राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या निर्देशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता दि.२० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी दि.२७ नोव्हेंबर २०२५ हा अंतीम दिनांक देण्यात आला होता. मा.राज्य निवडणूक आयोग यांच्या क्र.रानिआ/मनपा-२०२५/प्र.क्र.४१/का-५, दिनांक २६/११/२०२५ रोजीच्या आदेशान्वये त्यात सुधारणा करण्यात येत असून वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा *सुधारित अंतीम दिनांक ०३/१२/२०२५* करण्यात आला आहे. 

                    तरी नागरिकांना आपल्या हरकती व सूचना ह्या वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय व प्रभाग समिती कार्यालय येथे (कार्यालयीन वेळेत व सुट्टीचे दिवस वगळुन) नमुना ‘अ’ व नमुना ‘ब’ द्वारे लेखी स्वरूपात देता येईल. 


                                                                                  निवडणूक विभाग  

वसई विरार शहर महानगरपालिका

Home Admin Contact About
Home Admin Contact About