*वसईतील मच्छीमार बांधवांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक संपन्न*
*मा. आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण निर्णय*
वसई विधानसभा परिसरातील मच्छीमार बांधवांच्या समस्या, पुनर्वसन, उपजीविका आणि किनारपट्टी विकासाच्या संदर्भात आज मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली.
ही बैठक मा. मंत्री श्री. नितेशजी राणे (मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत वसई विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांनी वसई तालुक्यातील मच्छीमार समाजाच्या अडचणी, मागण्या व विकासाच्या विविध संकल्पना सविस्तर मांडल्या. त्यांच्या पुढाकाराने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
आजच्या बैठकीतील मुद्दे:
१) नायगाव ते घोडबंदर या जलमार्गावर रो - रो सेवा सुरू होणार.
२) अर्नाळा किल्ल्यावरून गुजरात दिशेने जाताना या भागात असलेला खडक फोडण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया सुरू करून लवकरच नौकानयन मार्ग मोकळा करणार.
३) पाचूबंदर येथे बोट यार्ड आणि ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यासाठी तात्काळ सर्व्हेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याचे मा. मंत्री , मस्त्यव्यवसाय आणि बंदरे यांचे आदेश.
४) अर्नाळा , पाचूबंदर या ठिकाणी सर्व सोयीयुक्त मच्छी मार्केट सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश.
५) किनारपट्टी भागात बर्फ कारखाना सुरू करण्यासाठी सोसायटयांनी प्रस्ताव दिल्यास त्यावर तातडीने निर्णय घेतले जातील असे आश्वासन मा. मंत्री यांनी दिले.
६) मागील काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे सुक्या माशांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी त्वरीत पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे मा. मंत्री , मस्तव्यवसाय यांचे आदेश.
या बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.श्री.नितेशजी राणे, वसई विधानसभेच्या आमदार सौ.स्नेहा दुबे पंडित, पदुमचे सचिव एन.रामस्वामी, मत्स्यआयुक्त किशोर तावडे, यांसह संबंधित अधिकरी व श्री.महेंद्र पाटील,श्री. बिजेंद्र कुमार, श्री. जितेंद्र मेहेर, श्री. देवदत्त मेहेर, श्री. विजय मेहेर, श्री. जयराज डवलेकर, श्री. अविनाश चावंडे मच्छीमार बांधव उपस्थित होते.
बैठकीदरम्यान मा. मंत्री श्री. नितेशजी राणे यांनी सर्व मांडणी गांभीर्याने ऐकून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
मा. आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित म्हणाल्या की —“वसईतील मच्छीमार बांधव हे आपल्या किनारपट्टीचे आधारस्तंभ आहेत. त्यांचे पुनर्वसन, शिक्षण, आरोग्य, आणि उपजीविकेच्या संधी यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आजच्या बैठकीत घेतलेले निर्णय वसईतील मत्स्यव्यवसायाचा चेहरा बदलतील.”
*आमदार सौ.स्नेहा ताई दुबे पंडित जनसंपर्क कार्यालय,वसई पश्चिम*

