वसई विरार शहर महानगरपालिका
दि.०८/१०/२०२५
*वसई विरार शहर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दीपावली निमित्त रु.२२०००/- इतके सानुग्रह अनुदान मंजूर.*
*दीपावली होणार अधिक "गोड"..!!!*
________________
वसई विरार शहर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी येत्या दिवाळी सणानिमित्त महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना (स्थायी/अस्थायी/ठेका) रक्कम रु.२२०००/- इतके सानुग्रह अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे.
सदरील दीपावली सानुग्रह अनुदानाचा लाभ सर्व कर्मचाऱ्यांना होणार असून दीपावली पूर्वी तातडीने सदरील सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे निर्देश मा.आयुक्त महोदयांनी महानगरपालिकेच्या आस्थापना व लेखा विभागास विभागास दिले आहेत.
गतवर्षीपेक्षा दहा टक्के वाढीव दराने सानुग्रह अनुदान मंजुर केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण असून त्यांनी मा.आयुक्त महोदयांचे आभार मानले आहेत.