वसई विरार शहर महानगरपालिका
अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मुलन विभाग
दि.०९/१०/२०२५
वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत अनधिकृत बांधकाम निष्काशन करण्याकरीता मा. आयुक्त साो. यांच्या निर्देशानुसार विशेष पथक नेमणूक करण्यात आल्या असून प्रभाग निहाय अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक इमारती, वाणिज्य, चाळी, निष्कासनासाठी प्रत्येक प्रभागाकरीता १ वरीष्ठ लिपीक व ४ कनिष्ठ अभियंता याच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.
दिनांक ०८/१०/२०२५ रोजी मा. आयुक्त साहेब, मा. अतिरिक्त आयुक्त साहेब उत्तर व दक्षिण, मा. उपायुक्त साहेब यांच्या निर्देशानुसार प्रभाग समिती ए, हद्दीतील दिशा अपा. एम. बी. इस्टेट, विरार (प.) अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - बी, हद्दीतील अस्मीता व निळकंठ इमा. बजरंग नगर, मोरेगाव तलावाजवळ अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ६०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - सी, हद्दीतील शिरसाड फाटा ते विरार फाटा व विरार फाटा ते नालासोपारा फाटा येथे पोलीस विभागाच्या सहकार्याने व महानगरपालिकेच्या प्रभाग समिती "सी" व विशेष नियोजन प्राधिकरण विभागांमार्फत संयुक्त कारवाई करून अनधिकृत पत्राशेड व अनधिकृत बांधकामावर निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - डी, हद्दीतील सर्वे ६, आचोळे गाव, नालासोपारा पूर्व येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण १६०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - ई, हद्दितील अलकापूरी, नालासोपारा पूर्व येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ६५० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - एफ, हद्दीतील गावरई पाडा ते संतोष भवन गावा पर्यंत अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण २३००० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - जी, हद्दीतील सातीवली तुंगारेश्वर ब्रिज पासून सातीवली खिंड पर्यंत हायवेच्या दोन्ही बाजूला येथे अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण १६३०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे. तसेच वालीव येथे पोलीस विभागाच्या सहकार्याने व महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत हातगाडयांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - आय, हद्दीतील राजानी इमारत, वसई गाव पर्यंत अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ३५० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) हद्दीतील शिरसाड फाटा ते विरार फाटा येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण १८४०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे. तसेच पोलीस विभागाच्या सहकार्याने व महानगरपालिकेच्या प्रभाग समिती "सी" व विशेष नियोजन प्राधिकरण विभागांमार्फत संयुक्त कारवाई करून अनधिकृत पत्राशेड, अनधिकृत टपऱ्यांवर व अनधिकृत बांधकामावर निष्कासन करण्यात आलेली आहे.
वरिल प्रमाणे वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत दि.०८/१०/२०२५ रोजी एकूण ६०९०० चौ. फुट अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे.