भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची मानवंदना - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Friday, 31 October 2025

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची मानवंदना

 


*भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची मानवंदना*


पालघर दिनांक 31 ऑक्टोबर: महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन एस के भंडारी समाज हॉल, पारनाका, वसई  या ठिकाणी दिनांक १ व २ नोव्हेंबर २०२५ रोजी दोन दिवस करण्यात आले आहे.

संविधानाचा जागर

मुंबई २७ नोव्हेंबर

यंदाचे वर्ष भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये  सांस्कृतिक  कार्यक्रमातून संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जाणार आहे.

गौरव गाथा संविधानाची या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार  यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन सांस्कृतिक कार्य विभाग सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे लाभले आहे.

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कलाकारांना  व्यासपीठ मिळणार आहे.  एस के भंडारी समाज हॉल, पारनाका, वसई या ठिकाणी दिनांक १ व २ नोव्हेंबर २०२५  रोजी दोन दिवस   सायंकाळी ६:०० ते ९:३० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत. दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी जागर संविधानाचा हे महानाट्य वैभव महाडिक लिखित व दिग्दर्शित महानाट्य सादर केले जाणार आहे.  तर दिनांक २ नोव्हेंबर२०२५ रोजी सायंकाळी ६ः३० ते १० या वेळामध्ये मेगा रिक्रेशन प्रस्तुत गौरवगाथा संविधानाची हा कार्यक्रम मंदार महामुनकर, अभिमान महाराष्ट्राचा वादक, स्वर तांबे मी होणार सुपरस्टार व छोटे उस्ताद फेम गायक, प्रज्ञा गावंड संगीत सम्राट व इंडियन आयडल फेम गायिका, निकेत इंगळे गायक निवेदक, विशाल कांबळे गायक, प्रतीक बाईंग, धीरज मोरेगावकर स्वप्निल निवळकर आणि सहकारी यांनी सादर केलेला भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

  रसिक प्रेक्षकांनी या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय विभीषण चवरे यांनी केले आहे.

Home Admin Contact About
Home Admin Contact About