वसई विरार शहर महानगरपालिका अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभाग - Vasai live Marathi news
📢 यह टेक्स्ट केवल Admin द्वारा संपादित किया जा सकता है।
📢 Breaking News: यहाँ Admin जो चाहे लिख सकता है — बाकी कोई नहीं बदल सकता।
📢 यहाँ पर अपना मैसेज लिखें — Breaking News, Event, या Announcement!
🔄 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...
🔴 Vasai Live News - अब सच्‍ची खबरें मिलेंगी आपकी अपनी वेबसाइट और YouTube चैनल पर! जुड़े रहिए सच्चाई के साथ! 🔴
✨ वसई लाईव्ह न्यूज संपर्क क्रमांक 9890188174✨

Tuesday, 7 October 2025

वसई विरार शहर महानगरपालिका अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभाग

 


वसई विरार शहर महानगरपालिका

अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभाग

दि.०७/१०/२०२५


वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत अनधिकृत बांधकाम निष्काशन करण्याकरीता मा. आयुक्त साो. यांच्या निर्देशानुसार विशेष पथक नेमणूक करण्यात आल्या असून प्रभाग निहाय अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक इमारती, वाणिज्य, चाळी, निष्कासनासाठी प्रत्येक प्रभागाकरीता १ वरीष्ठ लिपीक व ४ कनिष्ठ अभियंता याच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.


दिनांक ०७/१०/२०२५ रोजी मा. आयुक्त साहेब, मा. अतिरिक्त आयुक्त साहेब उत्तर व दक्षिण, मा. उपायुक्त साहेब यांच्या निर्देशानुसार प्रभाग समिती ए हद्दीतील दिशा अपा. एम.बी.इस्टेट, विरार (प.) अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ३०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.


- प्रभाग समिती बी, हद्दीतील निळकंठ इमा. बजरंग नगर, मोरेगाव तलावाजवळ अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ८०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.


प्रभाग समिती - सी, हद्दीतील विरार ते फुलपाडा येथे पोलीस विभागाच्या सहकार्याने व महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे.


प्रभाग समिती - ई, हद्दितील हनुमान नगर, नालासोपारा प. येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण १२०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे. तसेच नालासोपारा (प.) येथे पोलीस विभागाच्या सहकार्याने व महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे.


प्रभाग समिती - एफ, हद्दीतील वसई फाटा (नॅशनल हायवे) येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण १२००० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.


- प्रभाग समिती जी, हद्दीतील गोल्डन चॅरीयेट व अलबुराख हॉटेल ते तुंगारेश्वर ब्रीज येथे अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण २४३२० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे. तसेच वालीव येथे पोलीस विभागाच्या सहकार्याने व महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत हातगाडयांवर कारवाई करण्यात आलेली आहे.


वरिल प्रमाणे वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत दि.०७/१०/२०२५ रोजी एकूण ३८६२० चौ. फुट अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची करवाई करण्यात आलेली आहे.