वसई विरार शहर महानगरपालिका
दि.०१/१०/२०२५
*स्वच्छ हरित उत्सव व स्वच्छता अभियाना अंतर्गत मनपा मार्फत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणेची शालेय स्पर्धा संपन्न, स्पर्धेस विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद*
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी ०२ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याची पूर्वतयारी म्हणून, स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी २०१७ पासून दरवर्षी स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा साजरा केला जात आहे. दि.१७ सप्टेंबर ते दि.०२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा आयोजित करण्यात आला असून, या वर्षी "स्वच्छ उत्सव" हे अभियान राबविण्यास निर्देश दिले आहेत.
स्वच्छ हरित उत्सव व स्वच्छता अभियानाचा पुरस्कार (Advocacy for Swachhata) अंतर्गत दि. ३०/०९/२०२५ रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत शाळा/महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकरिता पर्यावरण पूरक (Eco friendly) व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंची स्पर्धा (Waste to Art) आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेमध्ये JOHN XXIII High School Virar (West)
Agnel School Waliv Vasai
Royal Public School Virar KARGIL NAGER
ANJUMAN URDU HIGH SCHOOL VIRAR EAST
N.G.Vartak English Medium High School & Junior College Virar (East)
Holy mary english medium school jr college
Annasaheb Vartak Smarak Vidyamandir, Virar. सदर स्पर्धेमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी तील शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंपासून कागदी कंदील, हार्मोनियम फुलदाणी, टेलिफोन इत्यादी वस्तू बनविण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग होता.