SHE BOX PORTAL वर खाजगी आस्थापनांची नोंदणी करने बंधनकारक
पालघर दि. १६ :- कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी POSH ACT २०१३ मधील कलम ४ अन्वये ज्या कार्यालया मध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशा सर्व आस्थापना मध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. व सदरच्या आस्थापनेतील अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी SHE BOX PORTAL वर करण्यासाठी केंद्र शासनाने निर्देश दिलेले आहेत.
पालघर जिल्हयातील सर्व खाजगी आस्थापनांनी SHE BOX PORTAL वर नोंदणी करणे बंधनकारक आहे. असे आवाहन विवेक चौधरी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा सदस्य सचिव, स्थानिक तक्रार निवारण समिती पालघर यांनी केले आहे. SHE BOX PORTAL वर खाजगी आस्थापनेतील तक्रार समिती नोंदविण्याची कार्यपद्धती खालीलप्रमाण े आहे. SHE BOX PORTAL. वर अंतर्गत तक्रार समिती नोंदविण्यासाठी कार्यपद्धती खालील प्रमाणे http://shebox.wed.gov.in या वेबसाईट वर जाऊन होम स्क्रीनवर दाखविल्या प्रमाणे अंतर्गत तक्रार समिती नोंदवा (Private Head Office Ragistration) या टॅब वर Click करून आवश्यक त्या सर्व माहितीचा तपशिल भरून Submit या Tab वर Click करून अंतर्गत तक्रार समितीची माहिती नोंदवता येईल.