स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान - Vasai live Marathi news
📢 यह टेक्स्ट केवल Admin द्वारा संपादित किया जा सकता है।
📢 Breaking News: यहाँ Admin जो चाहे लिख सकता है — बाकी कोई नहीं बदल सकता।
📢 यहाँ पर अपना मैसेज लिखें — Breaking News, Event, या Announcement!
🔄 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...
🔴 Vasai Live News - अब सच्‍ची खबरें मिलेंगी आपकी अपनी वेबसाइट और YouTube चैनल पर! जुड़े रहिए सच्चाई के साथ! 🔴
✨ वसई लाईव्ह न्यूज संपर्क क्रमांक 9890188174✨

Wednesday, 17 September 2025

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान

 वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग


"*स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान"*


*स्त्री शक्तीला आरोग्य शक्तीची साथ ठरणार विकसित भारताचा आधार*


महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत "स्वस्थ नारी, सशक्त परिवार" हे विशेष राष्ट्रीय अभियान आज दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण देशभर राबविण्यात आले.


या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ इंदौर, मध्य प्रदेश येथे थेट प्रक्षेपण व्दारे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. सदर कार्यक्रम थेट प्रक्षेपण व्दारे  महानगरपालिकेच्या सर.डी.एम. पेटीट रूग्णालय, वसई (प) येथे सकाळी आयोजित करण्यात आलेला होता. त्यावेळी मा.आमदार श्रीमती स्नेहा दुबे-पंडीत, मा. आमदार श्री. राजन नाईक, मा. आयुक्त श्री. मनोजकुमार सुर्यवंशी (भा.प्र.से), मा. अतिरिक्त आयुक्त, मा. उपायुक्त, वैद्यकिय आरोग्य अधिकारी, आर.सी. एच अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.


> सर.डी.एम.पेटीट, रुग्णालय, वसई येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. तसेच सर्व रुग्णालये व माता बाल संगोपन केंद्रे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष्मान आरोग्य मंदीर व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे खालील तज्ञ डॉक्टरांव्दारे तपासणी व शिबीरे घेण्यात आली. तसेच सिकलसेल अॅनेमिया स्क्रिनिंग, PMJAY कार्ड, MCP (Mother and Child Protection Card) कार्ड काढण्यात आले.




१ स्त्रीरोग तज्ञ


१स्क्रिनिंग शिबीरे


२ बालरोग तज्ञ


२ मातृत्व व बाल आरोग्य


३ किशोरवयीन आरोग्य


३ भिषक


४ शालेय आरोग्य तपासणी


४ न्युरोसर्जन


५ असंसर्गजन्य आजार


५ मुत्रविकार तज्ञ


६ अस्थिरोग तज्ञ


६ क्षयरोग जनजागृती तपासणी


७ महिलांसाठी व बालके पोषण जनजागृती सत्र


७ त्वचारोग तज्ञ


८ रक्तदान शिबीर


८ आयुर्वेद तज्ञ 


९ अवयवदान जनजागृती


९ शल्यचिकित्सक


१० लसीकरण


१० मानसोपचार तज्ञ


११ रक्त तपासणी


११ दंत चिकित्स्क


१२ नेत्र तपासणी


*> तपासणी लाभार्थी:-*


बालके रुग्ण ४३४


स्त्री रुग्ण २०६६


पुरुष रुग्ण  १४२७



पीएमजेएवाय कार्ड ३१३


गरोदर माता ६२०


ABHA कार्ड ३८८


सदर "स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान" दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुरु राहील.