*मा.वनमंत्री तथा पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत होणार एक लाख बांबूच्या रोपांचे वितरण*
वसई विरार शहर महानगरपालिका व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” अभियाना अंतर्गत मा.ना.श्री.गणेश नाईक, मंत्री, वने तथा पालकमंत्री पालघर जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत *“एक लाख बांबू रोपांचे वितरण”* कार्यक्रम *बुधवार दि.२४ सप्टेंबर, २०२५* रोजी *सायं. ०४.००* वाजता *महावीरधाम चॅरिटेबल ट्रस्ट, शिरसाड, मुंबई-अहमदाबाद महामार्ग, के.टी.रिसॉर्ट समोर, पो.मांडवी, ता.वसई, जि.पालघर* येथे आयोजित करण्यात आला आहे.
“हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या मोहिमेचा उद्देश महाराष्ट्रात झाडे लावणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे हा असून या मोहिमेचा उद्देश निसर्गाचे रक्षण करतानाच शाश्वत विकासाला चालना देणे आहे. या मोहिमेअंतर्गत मागे पडलेल्या बांबू उद्योगाला चालना देणे, बांबू लागवडीखालील क्षेत्र वाढविणे, बिगर वनीकरण क्षेत्रातील शासकीय व खाजगी जमिनीवर बांबू लागवड प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, हवामान बदलास तोंड देण्याची क्षमता निर्माण करणे तसेच उद्योगांसाठी दर्जेदार कच्चा माल उपलब्ध करून देणे हा उद्देश या बांबू लागवडीतून साध्य होणार आहे.
या कार्यक्रमात वनहक्क कायद्या अंतर्गत मंजूर दावे धारकांना बांबू रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.