*"वसईच्या संघर्षकन्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकारातून वसई विकासासाठी ठोस पाऊल"*
वसई सर्वांगीण विकासासाठी संघर्षकन्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण रस्ते, उड्डाणपूल व रेल्वे ओव्हर ब्रिज संदर्भातील कामांचा वेग वाढविण्यासाठी गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात एम एम आर डी च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.
बैठकीत खालील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय झाला :
🔹 बाफाने फाटा–उमेळा फाटा
🔹 वसई फाटा–वसई गाव
🔹 सातिवली फाटा–रेंज ऑफिस
🔹 तिवरी फाटा–वामन ढाबा
तसेच, गोखिवारा रेंज ऑफिस, एव्हरशाईन–वसंत नगरी व माणिकपूर नाका येथील उड्डाणपुलांचे डिझाईन व अलाइनमेंट निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. ही तिन्ही कामे आठवड्याभरात प्रस्तावित होणार आहेत.
याशिवाय, उमेळमान–नायगावसह चार महत्त्वाच्या रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामांचा समावेश शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
या बैठकीमुळे वसईतील पायाभूत सुविधांना गती मिळून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे संघर्षकन्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी सांगितले.
बैठकीस एमएमआरडीएचे मुख्य अभियंता श्री. प्रकाश भामरे, कार्यकारी अभियंता श्री. शेवाळे, महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री. प्रदीप पाचंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. संजय यादव व श्री. कुलकर्णी उपस्थित होते.
*आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित जनसंपर्क कार्यालय वसई पश्चिम.*