वसई विरार शहर महानगरपालिका
अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभाग
वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत अनधिकृत बांधकाम निष्काशन करण्याकरीता मा. आयुक्त साो. यांच्या निर्देशानुसार विशेष पथक नेमणूक करण्यात आल्याअसून प्रभाग निहाय अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक इमारती, वाणिज्य, चाळी, निष्कासनासाठी प्रत्येक प्रभागाकरीता १ वरीष्ठ लिपीक व ४ कनिष्ठ अभियंता याच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.
दिनांक १६/०९/२०२५ रोजी मा. आयुक्त साहेब, मा. अतिरिक्त आयुक्त साहेब उत्तर व दक्षिण, मा. उपायुक्त साहेब यांच्या निर्देशानुसार प्रभाग समिती ए, हद्दितील साईबाबा मंदिराजवळ, गावठन रोड येथील अति धोकादायक भेडा चाळीवर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ३०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - बी, हद्दितील मनवेलपाडा जानकी कुटीर येथे निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ११०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - सी, हद्दितील विरार पूर्व वनोठा पाडा, पेल्हार, वाघोबा मंदिर कुंभारपाडा नाका येथे प्लिंथ अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण २२०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - ई, हद्दितील मुतल्लीब फौजी चाळ, सोपारा येथे अति धोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ७०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - एफ, हद्दितील रिचर्ड कंपाऊड, पेल्हार येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ५४५० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - जी, हद्दितील धूमाळ नगर, वालीव (प्लिंन्थ) येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ५३०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - एच, हद्दितील पुष्पांजली इमारत, अंबाडी रोड, वसई प येथे अतिधोकादायक बांधकाम निष्कासनाची कारवाई सुरु असून ११२०० चौ फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - आय, हद्दितील टोक पाडा, गिरीज येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ९४०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
वरिल प्रमाणे वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत दि.१६/०९/२०२५ रोजी एकूण *३७८५० चौ. फुट* अनधिकृत बांधकाम व अति धोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे.
