वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग
दि.१६/०९/२०२५
"*स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान"*
*स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ ठरणार विकसित भारताचा आधार*
महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत *"स्वस्थ नारी, सशक्त परिवार"* हे विशेष राष्ट्रीय अभियान *१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५* दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे.
या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ इंदौर, मध्य प्रदेश येथे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरातील प्रमुख ठिकाणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील राज्यस्तरीय शुभारंभ सोहळा दि.*१७ सप्टेंबर २०२५* रोजी राज्यभर होणार असून सदर कार्यक्रम *महानगरपालिकेचे सर.डी.एम. पेटीट रूग्णालय, वसई (प)* येथे *सकाळी १०.०० ते दुपारी ४.००* वाजता मा. खासदार मा. आमदार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणार आहे. राज्यभरात त्याच दिवशी प्रत्येक जिल्हा व महापालिका स्तरावर *महिला व बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिरे* आयोजित करण्यात आले आहेत.
*या अभियानाची उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेतः -*
या अभियानाचा मुख्य उद्देश देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये महिला आणि मुलांसाठी तपासणी व विशेषज्ञ आरोग्य शिबिरे आयोजित करणे असा आहे.
या मोहिमेत रूग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष्मान आरोग्य मंदिर व आपला दवाखानामध्ये दररोज (AAM-SHC) तपासणी आणि जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे.
रुग्णालये (CHCs) आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे (AAM-PHC/UPHC) आयुष्मान आरोग्य मंदीर येथे विशेष तज्ञाव्दारे तपासणी शिबिरे घेतली जाणार आहे.
खाजगी महात्मा फुले जनआरोग्य योजना संलग्नीत रुग्णालये व क्लिनिक येथे देखील विशेषज्ञ आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
*या शिबिरांमध्ये विविध आरोग्य सेवा पुरवल्या जातील, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:*
*१. महिलांची आरोग्य तपासणीः-*
उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या निदानासाठी तपासणी करणे.
स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठीची तपासणी करणे.
जोखीम असलेल्या महिलांसाठी क्षयरोग (Tuberculosis) तपासणी.
किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी अॅनिमिया (रक्तक्षय) तपासणी आणि समुपदेशन.
आदिवासी भागातील महिलांसाठी सिकल सेल तपासणी कार्ड वाटप आणि आदिवासी भागात सिकल सेल आजाराबाबत समुपदेशन.
लसीकरण सत्र
*२. माता आणि बाल आरोग्य सेवा*
गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व काळजी (ANC) तपासणी व समुपदेशन करणे.
हिमोग्लोबिन तपासणी, तसेच पोषण आणि काळजी यावर समुपदेशन.
बालकांचे आवश्यकतेनुसार लसीकरण करण्यात येईल.
*३. आयुष सेवा*
या अंतर्गत आयुर्वेदिक उपचार पध्दतींची सेवा गरजू रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
*४. जनजागृती आणि वर्तणूक बदल संवाद*
किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीची स्वच्छता आणि पोषणाविषयी जागृती सत्रे आयोजित केली जातील.
पोषण विषयी समुपदेशन व निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शन
*५. रक्तदान शिबीरे.*
१ ऑक्टोबर हा राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिन असून त्याअनुषंगाने राष्ट्रीय महास्वेच्छा रक्तदान या अभियानात राबविण्यात येईल.
*६. नोंदणी आणि कार्ड वाटपः*
आयुष्यमान भारत डिजीटल मिशन कार्ड (ABDM), पंतप्रधान जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत नोंदणी व आयुष्यमान वय वंदना कार्ड वाटप सर्व गरजू व पात्र लाभार्थ्यांना करण्यात येईल.
*७. क्षयरोग निर्मुलनासाठी निक्षय मित्र स्वयंसेवकांची नोंदणी.*
क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषक आहार उपलब्ध करुन देण्यासाठी आणि क्षयरोगाविरुध्द जन आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी दानशुर व्यक्ती, संस्था आणि संघटनांना निक्षय मित्र बनवून सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. या करिता माय भारत स्वयंसेवक अथवा इतर स्वयंसेवकाच्या मदतीने निक्षय मित्रांची नोंदणी वाढवण्यात येईल, जेणेकरुन क्षयरोग मुक्त भारताचे ध्येय साध्य करणे शक्य होईल.
तपासणी शिबीरामध्ये (Screening camp) मध्ये आवश्यक असणा-या रुग्णांना विशेषज्ञा कडून तपासणी साठी संदर्भित केले जाईल व त्यांच्या आवश्यक त्या रक्त लघवीच्या तपासण्या, सोनोग्राफी, क्षकिरण तपासणी व शस्त्रक्रिया मोफत व नियोजन करुन करण्यात आले आहे.
*सहभागी संस्था व केंद्रे :*
७ रुग्णालये, २ माताबाल संगोपन केंद्रे, २१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ३४ आयुष्मान आरोग्य मंदीर, १५ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना.
खाजगी रूग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना सलग्न रुग्णालये सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांचा अभियानात सक्रिय सहभाग
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी डॉक्टारांच्या संघटना यांना या कार्यक्रमाबाबत सहकार्य देण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.
*कृती योजना :-*
मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एक महिला समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
दि. १७ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान ७ रुग्णालये, २ माताबाल संगोपन केंद्रे, २१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ३४ आयुष्मान आरोग्य मंदीर, १५ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सर्व ठिकाणी दररोज शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
वैद्यकीय आरोग्य विभाग
वसई विरार शहर महानगरपालिका