*१२ हजार कोटींच्या ड्रग्स प्रकरणी ऐतिहासिक कारवाई – वसईच्या संघर्षकन्या आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांची पोलिस आयुक्तालयाला भेट.*
राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या मोठ्या ड्रग्स प्रकरणी अलीकडेच पोलिसांनी एका ड्रग्स पेडलर महिलेला अटक केली होती. चौकशीदरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार पोलिसांनी थेट तेलंगणा राज्यातील कारखान्यावर छापा टाकून तब्बल १२ हजार कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले. या कारखान्यावर तत्काळ कारवाई करून तो बंद करण्यात आला.
या ऐतिहासिक कारवाईबद्दल वसई विधानसभेच्या संघर्षकन्या आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांनी आज मीरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालय, मीरा रोड (पूर्व) येथे भेट देऊन पोलिस आयुक्त श्री. निकेत कौशिक सर व त्यांच्या पोलिस दलाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या भेटीत आमदार सौ. स्नेहा ताईंनी पोलिस दलाच्या धाडसपूर्ण पावलांचे कौतुक करताना ही कारवाई समाजहिताचे आणि भावी पिढ्यांच्या संरक्षणाचे मोठे कार्य असल्याचे सांगितले.
तसेच, वसई परिसरातील कायदा-सुव्यवस्था, वाढते अनधिकृत बांधकाम, तसेच बांगलादेशी नागरिकांचे प्रमाण यांसारख्या गंभीर प्रश्नांवरही सविस्तर चर्चा झाली. यावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आमदार सौ. स्नेहा ताईंनी अधोरेखित केले.
या अभिनंदन भेटीद्वारे वसईकरांचा पोलिस दलावरील विश्वास अधिक दृढ झाला असून, आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित आणि पोलिस प्रशासन यांचे संयुक्त प्रयत्न निश्चितच वसईकरांसाठी सुरक्षित आणि गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यात यशस्वी ठरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.