*यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेमार्फत टेम्पो-ट्रक पुरविणेचा महानगरपालिकेचा नावीन्यपूर्ण उपक्रम*
वसई विरार शहर महानगरपलिकेमार्फत दरवर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणे कामी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. यावर्षीही महानगरपालिका क्षेत्रात मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, जेटी व बंद दगड खाणीत विसर्जनाची व्यवस्था, निर्माल्य पासून खतनिर्मिती इ.उपक्रम राबविण्यात आले.
याचबरोबर यंदाच्या वर्षी विरार व नालासोपारा येथील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्या मंडळांच्या मुर्त्या ह्या विसर्जन स्थळापर्यंत नेण्यासाठी महानगरपालिकेने वाहन पुरविणे बाबत महानगरपालिकेला विनंती केली होती. मंडळांनी केलेल्या विनंतीनुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मुर्त्या सुव्यवस्थित, जलदगतीने व कोणत्याही अडचणी शिवाय विसर्जन स्थळी नेण्याकरिता महानगरपालिकेतर्फे टेम्पो व ट्रक ची मोफत सुविधा देण्यात आली.
महानगरपालिकेला यावर्षी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जनावेळी मूर्ती नेण्यासाठी महानगरपालिकेतर्फे टेम्पो व ट्रक पुरविणे बाबत कळविले होते. सार्वजनिक मंडळापैकी १४ मंडळांनी मागणी केल्यानुसार महानगरपालिकेमार्फत एका वाहनात दोन मूर्ती याप्रमाणे ०७ ट्रक - टेम्पो अनंत चतुर्दशी दिवशी मंडळांना पुरविण्यात आल्या. मंडळांच्या मुर्त्या ह्या मॅकलिफ्ट च्या साहाय्याने वाहनात व्यवस्थितरित्या चढवून नंतर त्या विसर्जन स्थळी योग्यरित्या उतरवून त्याचे विसर्जन करणे संबंधी सर्व बाबींमध्ये महानगर पालिकेने या गणेशोत्सव मंडळांना मदत केली. या उपक्रमामुळे सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती व्यवस्थितरित्या व कोणतीही अडचण न येता जलद गतीने विसर्जनाच्या ठिकाणी नेता आल्या.
महानगरपालिकेच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महानगर पालिकेचे आभार मानले आहेत.