*डहाणू अन्न पुरवठा अधिकारी विरोध आक्रोश*
*मनमानी कारभार चालवत असल्याचा आरोप करत बुधवारी लाल बावटा पक्षाकडून धरणे आंदोलनाचा ईशारा*
डहाणू अन्न पुरवठा अधिकारी विरोधात माक्सवादी लेनिनवादी पक्ष लाल बावटा कडुन बुधवार दिनांक 10/09/25 रोजी सायंकाळी 11 वाजेपासून पुरवठा अधिकार्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा एका लेखी पत्राद्वारे प्रशासनाला ईशारा देण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून आदिवासी समाजाचे रेशनकार्डाचे प्रकर्ण प्रलंबित आहेत. आदिवासी समाजाच्या हितासाठी स्थापीत झालेले कायदे पायदळी तुडवत 500 रुपये च्या बाॅंड पेपर्स वर प्रतीज्ञा पत्र सादर करण्याच्या जाचक अटी घालून गरिबी आदिवासी समाजाचे रेशनकार्ड चे प्रकरण प्रलंबित ठेवून आर्थिक मोहमाय बाळगत असल्याचा आरोप पक्षाचे पदाधिकार्यांनी केला आहे.
लेखी पत्राद्वारे जिल्हा अन्न पुरवठा अधिकार्यांना पत्र लिहून ईशारा देण्यात आला आहे की
जोवर ठोस कारवाई करुन उचलबांगडी करण्यात येत नाही तोवर आमचे बेमुदत धरणे आंदोलन सुरुच राहिल.
कायदा सुवेव्सथेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन राहिल असा सुध्दा ईशारा ठणकावून देण्यात आला आहे.