*मा.परिवहन मंत्री ना.श्री.प्रताप सरनाईक यांच्या लोक दरबाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद,*
*जनतेच्या तक्रारींचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे परिवहन मंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश.*
गुरुवार दि.११ सप्टेंबर २०२५ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात मा.ना.श्री.प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली लोक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
या लोक दरबारात मा.आमदार श्री.राजेंद्र गावित, मा.आमदार रविंद्र फाटक,महानगरपालिका आयुक्त मा.श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.), मा.अतिरिक्त आयुक्त श्री.संजय हेरवाडे, मा.अतिरिक्त आयुक्त श्री.दिपक सावंत, पोलीस उपायुक्त श्री.सुहास बावचे जिल्ह्यातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांच्या समस्यांचे त्यांच्या जिल्ह्याच्या, महानगरपालिकेच्या ठिकाणीच जलदगतीने निराकरण व्हावे, नागरिकांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करणेसाठी मंत्रालय किंवा इतर ठिकाणी फेऱ्या माराव्या लागू नये या हेतूने लोक दरबार घेण्यात येत असल्याचे मा.मंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.
वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या या लोक दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या लोक दरबारामध्ये नागरिकांना आपले अर्ज, निवेदने सादर करण्यासाठी विविध शासकीय विभागनिहाय एकूण २० टेबल ठेवण्यात आले होते. सुरुवातीस उपस्थित नागरिकांना टोकन वाटप करण्यात आले. त्यानंतर मा.परिवहन मंत्री ना.श्री.प्रताप सरनाईक यांनी नागरिकांच्या प्राप्त तक्रारींचे निवारण करून संबंधित विभागाकडे पुढील कारवाई साठी तक्रारी अर्ज पाठविण्यात आले. या लोक दरबारात एकूण ३२० तक्रारी अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी काही तक्रारी अर्जांचे तात्काळ निवारण करण्यात आले. उर्वरित तक्रारी अर्जांचे त्या त्या विभागाला पाठवून तक्रारींचे निवारण करण्याचे आदेश मा.परिवहन मंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले.
लोकदरबारा नंतर मा.मंत्री महोदयांनी उपस्थित सर्व शासकीय विभागांचे,जनतेचे व पत्रकार बांधवांचे आभार मानले.शेवटी राज्यगीत व राष्ट्रगीत होवून कार्यक्रम संपन्न झाला.