वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत अनधिकृत बांधकाम निष्काशन करण्याकरीता मा. आयुक्त साो. यांच्या निर्देशानुसार विशेष पथक नेमणूक करण्यात आल्याअसून प्रभाग निहाय अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक इमारती, वाणिज्य, चाळी, निष्कासनासाठी प्रत्येक प्रभागाकरीता १ वरीष्ठ लिपीक व ४ कनिष्ठ अभियंता याच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.
दिनांक ११/०९/२०२५ रोजी मा. आयुक्त साहेब, मा. अतिरिक्त आयुक्त साहेब उत्तर व दक्षिण, मा. उपायुक्त साहेब यांच्या निर्देशानुसार प्रभाग समिती बी, हद्दितील सितारा बेकरीच्या समोर व मागे, नगीनदास येथे अति धोकादायक इमारतीवर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण २३०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती सी, हद्दितील सहकार नगर, सर्वे. नं. ७० येथे G +४ मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण २४०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - डी, हद्दितील गाला नगर, तुळींज रोड, सिग्नल जवळ, पारस सोसायटी (स्लॅब) येथे अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ५४५० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - ई, हद्दितील टाकीपाडा, गास येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण १८०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती एफ, हद्दितील चौधरी कंपाऊंट, वाकनपाडा येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ३९०० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - जी, हद्दितील कामण, देवदळ येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण ६०२७६ चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - एच, हद्दितील डिमेलो वाडी, माणिकपूर जवळील अति धोकादायक चाळीवर निष्कासनाची कारवाई सुरु असून २७० चौ फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती आय, हद्दितील उमेळमाण स्मशानभुमीच्या मागे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण ७५० चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
वरिल प्रमाणे वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत दिनांक ११/०९/२०२५ रोजी एकूण ७८०४६ चौ. फुट अनधिकृत बांधकाम व अति धोकादायक बांधकामावर निष्कासनाची करवाई करण्यात आलेली आहे.
