वसई विरार शहर महानगरपालिकेस सुर्या टप्पा - 1 व टप्पा - 3 योजनेअंतर्गत 200 द.ल.ली. तसेच MMRDA च्या सुर्या 403 द.ल.ली. पाणी पुरवठा योजनेमधून 150 द.ल.ली. असा एकूण 350 द.ल.ली. पाणी पुरवठा होत आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत मौजे ढेकाळे येथे जलवाहिनी जोडणी करण्या- करीता शुक्रवार दि.12/09/2025 रोजी सकाळी 10.00 ते दि. 14/09/2025 सकाळी 10.00 वाजेपर्यंत सुर्या योजना टप्पा - 1 (जुनी सुर्या योजना) मार्फत होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
तसेच दि. 12/09/2025 रोजी मौजे काशिद कोपर येथे जलवाहिनीवरील Valve दुरुस्तीच्या कामांकरीता दि.12/09/2025 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत महानगरपालिकेची सुर्या योजना (नवीन सुर्या योजना) व MMRDA च्या सुर्या योजनेअंतर्गत होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
तरी शुक्रवार दि. 12/09/2025 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत घेण्यांत येणाऱ्या Shut Down मुळे महापालिकेच्या सुर्या टप्पा 1 व 3 तसेच MMRDA च्या सुर्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे. तसेच पुढील 24 तास शहरामधील होणारा पाणी पुरवठा अनियमीत व कमी दाबाने होईल सबब नागरीकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे ही विनंती.
उप आयुक्त
पाणी पुरवठा विभाग
वसई विरार शहर महानगरपालिका