*पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन*
पालघर दि. १५ (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मंगलप्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या संकल्पनेतून राज्यामध्ये २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये १००० रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्हयामध्ये या आर्थिक वर्षामध्ये २० रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर या कार्यालयाचा मानस आहे. सदर रोजगार मेळावे जिल्हयातील तसेच महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात येणार असुन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर व स्वामी विवेकानंद आर्टस, सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज वाडा, यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ सेप्टेंबर २०२५ रोजी, स्वामी विवेकानंद आर्टस, सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज ता. वाडा, जि. पालघर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
पालघर जिल्ह्यातील खाजगी कंपन्यांनी/आस्थापनांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावी तसेच नोकरी/रोजगार इच्छुक बेरोजगार युवक-युवतींनी आपली नोंदणी https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर करावी, असे आवाहन रेणुका तम्मलवार, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर यांचेकडुन करण्यात आले आहे. खाजगी आस्थापनांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची नोंदणी वेब पोर्टलवर करण्यासाठी अंतिम तारीख १६ सेप्टेंबर, २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत असून याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्हा कार्यालयाच्या ०२५२५ २९९८१२ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
राज्यातील बेरोजगार युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता (Employability) वाढविण्यासाठी "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" कार्यन्वीत करण्यात आलेली आहे. सदर योजनेंतर्गत खाजगी आस्थापनेमध्ये नव्याने रूजु होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्याना रुजु दिनांकापासुन ११ महिने प्रशिक्षण घेता येणार आहे. प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार (बारावी उत्तीर्ण-6,000/-दरमहा, ।। / पदविका उत्तीर्ण-८,०००/- दरमहा, पदवी उत्तीर्ण १००००/- दरमहा) DBT द्वारे विद्यावेतन अदा केले जात आहे. याकरीता विभागाच्या www.cmykpy.mahaswayam.gov.in या पोर्टलवर आस्थापना तथा प्रशिक्षणार्थीनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. तरी जास्तीत जास्त खाजगी आस्थापना तथा बेरोजगार युवक युवतींनी सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता रोजगार मेळाव्यामध्ये बायोडेटाच्या ५ छायांकित प्रती सह उपस्थित राहावे असे आवाहन रेणुका तम्मलवार, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर यांचेकडुन करण्यात आले आहे.
