पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली २४ सप्टेंबर रोजी विक्रमगड येथे जनता दरबाराचे आयोजन
*विक्रमगड येथे होणाऱ्या जनता दरबारामध्ये पालकमंत्री गणेश नाईक नागरिकांशी थेट संवाद साधणार*
पालघर दि १९ सप्टेंबर : वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता विक्रमगड येथील पंचायत समिती येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. या जनता दरबारामध्ये नागरिकाच्या समस्या , अडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक नागरिकाशी थेट संवाद साधणार आहेत.
नागरिकांनी आपल्या समस्याचे , प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी विक्रमगड येथे २४ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.
जनता दरबारामध्ये नागरिकांच्या तक्रारी अर्जाचे निवारण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता.
२४ सप्टेंबर रोजी पंचायत समिती, विक्रमगड येथे होणाऱ्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या समस्या किंवा प्रश्नाचा निपटारा करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे.