वसई विरार शहर महानगरपालिका जनगणना २०२७ च्या अनुषंगाने प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या प्रशिक्षणास सुरुवात - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Wednesday, 29 April 2026

वसई विरार शहर महानगरपालिका जनगणना २०२७ च्या अनुषंगाने प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या प्रशिक्षणास सुरुवात


 वसई-विरार शहर महानगरपालिका 

                                                                                                                                                                दि.२९/०४/२०२६      



*जणगणना २०२७ च्या अनुषंगाने प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या प्रशिक्षणास सुरुवात*


जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला वसई विरार शहर महानगरपालिकेत जोमाने सुरुवात झाली आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्याच्या प्रशिक्षणास दि.२७ एप्रिल पासून सुरुवात झाली असून सदरील प्रशिक्षण दि.०८ मे पर्यंत सुरु राहील. हे प्रशिक्षण तीन टप्प्यात होत असून क्षेत्रीय प्रशिक्षकांमार्फत (Field Trainers) पर्यवेक्षक व प्रगणकांना प्रशिक्षण दिले जात आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेतील नऊ प्रभाग समित्यांअंतर्गत नियुक्त शाळा/महाविद्यालयांमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जनगणनेच्या कामासाठी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ०१ मास्टर ट्रेनर, ९१ क्षेत्रीय प्रशिक्षक (Field Trainers), ७१७ पर्यवेक्षक व ४२९८ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रभाग समिती ‘डी’ आचोळे अंतर्गत आयोजित प्रशिक्षण शिबिरास मा.आयुक्त श्री.पृथ्वीराज बी.पी.(भा.प्र.से.) यांनी भेट देऊन उपस्थित पर्यवेक्षक व प्रगणकांना मार्गदर्शन दिले. तसेच प्रशिक्षणाच्या नियोजनाची पाहणी केली. दि.०१ मे पासून सुरु होणाऱ्या स्वगणना प्रक्रियेत स्वगणना करून सक्रीय सहभाग घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्याचे कामही पर्यवेक्षक, प्रगणक यांनी करावे असे आवाहनही मा.आयुक्त महोदयांनी केले. यावेळी मा.अतिरिक्त आयुक्त श्री.संजय हेरवाडे, उप-आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी श्रीमती हर्षला राणे, प्रभाग सहाय्यक आयुक्त श्री.महेश पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते.

   जनगणना २०२७ ही देशातील पहिलीच डिजिटल जनगणना असल्यामुळे संबंधित पर्यवेक्षक व प्रगणकांना योग्य व अचूक प्रशिक्षण देण्यात येत असून प्रशिक्षणादरम्यान विशेष मोबाईल ॲपचा वापर, प्रश्नावलीचे सुलभीकरण आणि डेटाची सुरक्षा या तांत्रिक बाबींवर भर दिला जात आहे.

Home Admin Contact About
Home Admin Contact About