ॲड. डॉ. अशोक भाईडकर लिखित दशावतार ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे दिमाखदार प्रकाशन : मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सामवेशाचीही घोषणा - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Wednesday, 22 April 2026

ॲड. डॉ. अशोक भाईडकर लिखित दशावतार ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे दिमाखदार प्रकाशन : मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सामवेशाचीही घोषणा




*ॲड. डॉ. अशोक भाईडकर लिखित 'दशावतार' ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे दिमाखदार प्रकाशन; मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेशाचीही घोषणा......*


मुंबई: आरती आर्ट अकादमी, वेताळ प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृहात आयोजित केलेले 'तिसरे दशावतारी नाट्यसंमेलन' अभूतपूर्व गर्दीत आणि उत्साहात पार पडले. रसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे हे संमेलन पूर्णपणे 'हाऊसफुल्ल' झाले होते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ज्येष्ठ संशोधक ॲड. डॉ. अशोक भाईडकर यांच्या महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन.

या सोहळ्यात डिंपल पब्लिकेशन प्रकाशित डॉ. भाईडकर यांच्या 'दशावतार' या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे आणि 'The Great Indian Folk Drama: Dashavatar' या इंग्रजी पुस्तकाचे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन होणार करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी एक मोठी घोषणा केली. "दशावतारावर इतके सखोल संशोधन करणारे हे ग्रंथ आता मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले जातील," असे त्यांनी जाहीर केले. यामुळे या लोककलेचा शास्त्रीय अभ्यास नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजक डॉ. अशोक भाईडकर यांनी आपल्या भाषणात युवा साहित्यिकांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या नावाने त्यांनी शिष्यवृत्ती सुरू करण्याचे जाहीर केले, जेणेकरून युवा प्रतिभेला साहित्यात वाव मिळेल. याच कार्यक्रमात लेखिका श्रुती रसाळ यांचा 'युवा साहित्यिक' म्हणून विशेष गौरव करण्यात आला.दशावतारी 

संमेलनाचे अध्यक्ष यशवंत तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात गोव्याच्या सप्तसूर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र केरकर, निर्माता,दिग्दर्शक प्रदीप कबरे,आणि डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे हे उपस्थिती होते.प्रेक्षागृहात अभिनेते नारायण जाधव,अरुण होर्णेकर,पत्रकार राजीव जोशी उपस्थित होते.

या समारंभात दशावतारी नाटकांच्या प्रयोगांनी रंगत आणली. संमेलनाला मिळालेला 'हाऊसफुल्ल' प्रतिसाद आणि जाहीर झालेले ऐतिहासिक निर्णय यामुळे हे संमेलन दशावतारी कलेच्या इतिहासात मैलाचा दगड ठरले आहे.

Home Admin Contact About
Home Admin Contact About